मिथुन दा उपचारासाठी अमेरिकेत

मुंबई : बॉलीवूडचे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावलेली आहे. ते सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महाअक्षय आणि सून मदालसा शर्मा आहेत. मिथुन चक्रवर्ती मागील काही काही महिन्यांपासून क्रॉनिक बॅक पेनने ग्रस्त आहेत. भारतातील उपचाराने …

मिथुन दा उपचारासाठी अमेरिकेत

मुंबई : बॉलीवूडचे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावलेली आहे. ते सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महाअक्षय आणि सून मदालसा शर्मा आहेत.

मिथुन चक्रवर्ती मागील काही काही महिन्यांपासून क्रॉनिक बॅक पेनने ग्रस्त आहेत. भारतातील उपचाराने त्यांच्या प्रकृतीत समधानकारक बदल जाणवत नसल्याने त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले. दोन वर्षांआधीही ते याच आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते.

मिथुन दा हे 2009 साली आलेल्या ‘लक’ या सिनेमात स्टंट करताना जखमी झाले होते. तेव्हापासूनच त्यांना ही क्रॉनिक बॅक पेनची समस्या सुरु झाली. लक या सिनेमात अभिनेता इमरान खान, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री श्रुती हसन हे मुख्य भूमिकेत होते.

मे महिन्यातही मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत खराब झाली होती. पाठीच्या दुखण्याने ते एक वर्षापर्यंत लाइमलाईटपासून दूर होते. तर खालावलेल्या प्रकृतीमुळे त्यांनी राज्यसभेतूनही राजीनामा दिला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *