REVIEW : कलंक.. अपूर्ण राहिलेलं पेंटिंग!

‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है; उन्हे निभाना नही चुकाना पडता है’! अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ या चित्रपटातील हा संवाद. या संवादावरुन नेमकं या चित्रपटात काय असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. निर्माता करण जोहरचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. तब्ब्ल 20 वर्षांपूर्वी करणला या चित्रपटाचं कथानक सुचलं होतं. शाहरुख खान; […]

REVIEW : कलंक.. अपूर्ण राहिलेलं पेंटिंग!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

‘कुछ रिश्ते कर्जो की तरह होते है; उन्हे निभाना नही चुकाना पडता है’! अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ या चित्रपटातील हा संवाद. या संवादावरुन नेमकं या चित्रपटात काय असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. निर्माता करण जोहरचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. तब्ब्ल 20 वर्षांपूर्वी करणला या चित्रपटाचं कथानक सुचलं होतं. शाहरुख खान; काजोल; राणी मुखर्जी; अजय देवगण अशी तगडी स्टारकास्ट घेऊन करण हा चित्रपट करणार होता. काही कारणास्तव करणचा हा स्वप्नवत प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ शकला. कदाचित तेव्हा करणनं हा सिनेमा बनवला असता तर सुपरहिट ठरला असता. पण आता मात्र करणचं हे स्वप्न सुंदर पेटिंगप्रमाणे रेखाटलं तर गेलंय मात्र पेटिंगच्या बऱ्याच भागात रंग भरायचेच राहून गेलेत. त्यामुळे हे पेटिंग अपूर्ण वाटतं.

‘कलंक’ म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारे भव्य  सेट; दमदार अभिनय; उत्कृष्ट संगीत; उत्तम क्लायमॅक्स…पण..पण कथेचं काय???. इथेच ‘कलंक’नं मार खाल्लाये. जर कथानकावर मेहनत घेतली असती तर उत्तम प्रेमकथा रसिकांना अनुभवायला मिळाली असती. काळानुरुप कथानकात बदल करण्याचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि करण जोहरने कष्ट नाही घेतले हे बघून आश्चर्य वाटतंय.  प्रेमाच्या शोधात असलेलं चित्रपटातील प्रत्येक पात्र संपूर्ण चित्रपटात आपल्या नात्यांच्या कर्जाची परतफेड करतांना दिसतं. प्रत्येक पात्रांना प्रेम तर मिळतं पण त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहते.

चित्रपटाची कथा भारत पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर 1940मध्ये हुसैनाबादमध्ये सुरु होते. लाहोर  जवळच्या हुसैनाबाद शहरात लोहार काम करणारे बहुसंख्य मुस्लिम राहत असतात आणि याच शहरात चौधरी नावाचे श्रीमंत घराणं वास्तव करत असते. बलराज चौधरी ( संजय दत्त) आणि त्यांचा मुलगा देव चौधरी ( आदित्य कपूर) मिळून डेली टाईम्स नावाचे वृत्तपत्र चालवत असतात. देवची बायको सत्या(सोनाक्षी)ला कँन्सर असतो. मरण्याआधी सत्या देवला दुसरं लग्न करण्याची गळ घालते. हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या रुप(आलिया)सोबत देवचं दुसरं लग्न होतं. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच देव रुपला या नात्यात तिला सन्मान मिळेल पण प्रेम नाही; सत्याचं आपलं पहिलं प्रेम असेल असं सांगतो..रुपला गाण्याची आवड असल्यामुळे ति बेगम बहार(माधुरी)कडे गाणं शिकायला जात असते.तिथे तिची ओळख जाफर(वरुण)शी होते. आणि इथून ‘कलंक’ची कथा सुरु होते..या कथेत अब्दुल(कुणाल खेमू)चीही महत्त्वाची भूमिका आहे. देव चौधरीच्या एका निर्णयाविरोधात अब्दुल हिंदू-मुस्लिम दंगे भडकवायलाही मागे पुढे बघत नाही. आता जाफरचं रुपवर खरं प्रेम असतं का? का तो तिला फक्त प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. बलराज आणि जाफरचं नातं काय? बेगम आणि बलराजचा भूतकाळ काय असतो? देवच्या कोणत्या निर्णयामुळे अब्दुल दंगे भडकवतो?  तो चौधरी कुटुंबाला उध्वस्त करतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘कलंक’ बघावा लागेल.

80-90च्या दशकातील त्रिशूल; नाजायज;गैर अशा तत्सम सिनेमांची आठवण ‘कलंक’ बघतांना होते. ‘नाजायझ बेटा बापसे बदला चाहता है’; दु:खी मां; घमेंडी बाप; विवाहबाह्य संबंध असा सगळा गुळगुळीत झालेला फॉर्म्युला या सिनेमात आहे. सिनेमाच्या कथेत मुख्यत: प्रेम आणि नात्यांवर फोकस करण्यात आला आहे. पण गुंतवून ठेवणारी पटकथा गुंफण्यात दिग्दर्शक म्हणून अभिषेक कमी पडलाये. एवढे तगडे कलाकार सिनेमात असतांना त्यांचा योग्य वापर दिग्दर्शकानं करायला हवा होता. चित्रपटाचं कथानक अत्यंत ढिसाळ आणि गुंतागुंतीचं असल्यामुळे चित्रपट रटाळवाणा झालाये. चित्रपटाचा फर्स्ट हाफ प्रचंड स्लो आहे. दिग्दर्शकानं फाळणीपूर्वीचा माहौल तयार करण्यात आणि पात्र परिचयात  वेळ घेतलाये. त्यामुळे चित्रपटाची गती मंदावलीये.

आलियानं पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिलीय. तर वरुणनंही जाफर उत्तम रंगवलाय. हे दोघं कथेचा केंद्रबिंदू असल्यामुळे बराच भार त्यांच्या खांद्यावर होता. पण दोघांची केमिस्ट्री खरंच वाखाणण्याजोगी आहे. शांत देवच्या भूमिकेत आदित्य कपूरनं प्रभावित केलंय.अपूर्ण प्रेमाची शिकार बेगमच्या भूमिकेत माधुरीने नृत्य आणि अभिनयात जबरदस्त अदाकारी केलीये. सत्याच्या भूमिकेत सोनाक्षीला विशेष वाव नाही. तर बलराजच्या भूमिकेत संजय दत्तच्या वाट्यालाही विशेष काम नाही. शांत; संयमी संजू बाबाचं रुप कदाचित त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही. बलराजचं पात्र पॉवरफुल होतं..ते अजून रंगवायला हवं होतं. 25 वर्षांनी माधुरी- संजय दत्त एकत्र काम करताये. पण त्यांच्या वाट्याला एकत्र केवळ एक सीन. या जोडीच्या फँन्सचा याने हिरमोड होऊ शकतो. अब्दुलच्या भूमिकेत कुणाल खेमू सरप्राईज ठरलाये. त्यानं धूर्त अब्दूल उत्तम वठवलाये. कुणालची आतापर्यंतची ही उत्तम भूमिका असेल.

चित्रपटातील डोळ्याचे पारणे फेडणारे भव्य सेट बघुन बऱ्याचदा  आपण संजय लीला भन्साळींचा सिनेमा पाहात असल्याचा भास होतो. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही अप्रतिम आहे. प्रीतम यांचं संगीत तर आधीच हिट झालंय. विशेषत: ‘बाकी सब फर्स्ट क्लास है’; ‘तबाह हो गये’आणि ‘कलंक है’ ही गाणी मस्त जमून आलीयेत..चित्रपटातील संवाद दमदार आहेत.पण काही ठिकाणी याचा ओव्हरडोस झाल्यासारखं वाटतं. चित्रपटाची लांबीही खुप असून ती अजून कमी केली असती तर बरं झालं असतं. काही दृश्य मस्त जमून आली आहेत. तर काही बाळबोध आणि तर्कापलिकडील वाटतात.

एकूणचं काय तर आलियाचा अजून एक उत्तम परफॉर्मन्स; वरुणचा गजब जाफर; माधुरीची नजाकत; भव्यता असूनही  हा ‘कलंक’ कंटाळवाणा वाटतो. ‘टीव्ही 9  मराठी’कडून ‘कलंक’ला मी देतोय दोन स्टार्स.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.