REVIEW : ‘बाहुबली’वर ‘साहो’चा कलंक

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला 'साहो' मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला. पण म्हणतात ना, 'जो दिखता है, असल मे वैसा होता नही!' ही म्हण या चित्रपटाला तंतोतंत लागू (Saaho Review) पडते.

REVIEW : 'बाहुबली'वर 'साहो'चा कलंक
Follow us
| Updated on: Aug 30, 2019 | 7:43 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘साहो’ मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला. पण म्हणतात ना, ‘जो दिखता है, असल मे वैसा होता नही!’ ही म्हण या चित्रपटाला तंतोतंत लागू (Saaho Review) पडते. चकाचक विदेशी लोकेशन्स, भन्नाट चेसिंग (Saaho Review) सिक्वेन्स, नायिकेचा ग्लॅमरचा तडका, सिक्सपॅक वगैरे तत्सम गोष्टी असलेला धिप्पाड हिरो, डोळ्याचे पारणे फेडणारी भव्यता असं सगळं असलं म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारच असा ‘फाजिल’ आत्मविश्वास निर्मात्यांना कुठून येतो हे न उलगडणारं कोडं (Saaho Review) आहे. ‘बाहुबली’मुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रभासचा ‘साहो’ याचं ताजं उदाहरण.

‘बाहुबली’ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे दक्षिणेचा सिनेमा हिंदीतही मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्याची जणू स्पर्धाच निर्मात्यांमध्ये लागली. आगामी काळात अनेक दक्षिणचे चित्रपट हिंदीतही मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार आहेत. पण त्या सिनेमांचे निर्माते, हिंदीत ते चित्रपट वितरित करणारे मोठे प्रॉडक्शन हाऊस यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की प्रत्येक सिनेमा ‘बाहुबली’ होऊ शकत नाही. तामिळ, तेलगू सिनेमांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. ज्या कथा, सादरीकरण तिकडे स्वीकारलं जातं ते बॉलिवूडमध्ये स्वीकारलं जाईल असं अजिबात नाही. ‘साहो’वर लागलेला हा ‘कलंक’ पाहून आता तरी इंडस्ट्रीला शहाणपण येईल अशी आशा करायला हरकत नाही.

चित्रपटाची कथा मुंबईतील एका मोठ्या दरोड्याने सुरु होते. तब्बल 2000 कोटींच्या या दरोड्याचा छडा लावण्याची जबाबदारी अंडर कव्हर एजंट सिध्दार्थ नंदन/अशोक चक्रवर्ती (प्रभास- Prabhas) आणि क्राईम बांचच्या अमृता नायर(श्रध्दा कपूर – Shraddha Kapoor) वर येते. या दरोड्याचा शोध लावण्यासाठी त्यांना आधी एका ब्लॅक बॉक्सचा शोध लावायचा आहे. त्या बॉक्समध्ये अनेकांच्या नशिबाची चावी दडलेली असते. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावतांना सिनेमाची कथा जगभरातील विविध शहरात रंगते. आता दरोड्याचा छडा सिध्दांत-अमृता कसा लावतात? ब्लॅक बॉक्समध्ये काय रहस्य दडलेलं असतं? साहो म्हणजे नेमकं काय? या सगळ्याचा खरा मास्टरमाईंड कोण असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘साहो’ बघावा लागेल.

चित्रपटाचा प्लॉट इंटरेस्टींग आहे, पण मांडणी मात्र फसली. कथेची झालेली गुंतागुंत आणि दिग्दर्शकाचा बाळबोधपणा यामुळे चित्रपट गंडलाय. भव्य चित्रपट बनवण्याच्या नादात काहीतरी पोरखेळ प्रेक्षकांना आवडेल असा दिग्दर्शकाचा समज झालेला दिसतो. चित्रपट मध्यंतरापर्यंत चांगला जमलाय. चित्रपटाचा मध्यांतर पण धक्कादायक वळणावर होतो. त्यामुळे हा सिनेमा मध्यंतरानंतर अजून उंची गाठेल अशी भाबडी आशा आपल्याला लागते. पण मध्यंतरानंतर चित्रपट सुरु झाल्यावर संपेपर्यंत आपण फक्त टाहो फोडायचं बाकी राहतो. अहो संपता संपत नाही चित्रपट. कलाकारांच्या भाऊगर्दीत दिग्दर्शक इतका हरवलाय की चित्रपटाला ‘कथा’ नावाचा प्रकार असतो याचा जणू त्याला विसरच पडलाय.

चित्रपटात ज्या घटना घडतात, त्या मुळातच का घडतात याचा विचार हा संपेपर्यंत तुमच्या मनात घोळत राहतो. प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, मंदिरा बेदी, चंकी पांडे अशी भलीमोठी कलाकारांची फौज या सिनेमात आहे. पण कलाकारांच्या या भाऊगर्दीत सिनेमाची आत्मा असणारी पटकथाच कुठेतरी हरवली. महागड्या गाड्या उडवून, मारहाण दाखवून, जीवघेणे स्टंट करुन लार्जर दॅन लाईफ काहीतरी पडद्यावर दाखवणं म्हणजे सिनेमा हिट हे गृहीतक आता खोडून काढायची वेळ आली आहे.

सिनेमाचं बजेट तब्बल 350 कोटी असल्याचं बोललं जातंय. या सिनेमाच बजेट खरंच एवढं असेल तर निर्मात्यांचा पैसा खरंच पाण्यात गेला असं म्हणावं लागेल. सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट यातील अॅक्शन सीन्स आहेत, मात्र ठाराविक वेळेनंतर त्याचाही अतिरेक झाल्यासारखा वाटतो. सुजितचं बालिश दिग्दर्शन, कमकुवत कथानक याने चित्रपटाचा घात केलाय. चित्रपटाची लांबीही अजून 30 मिनिटे कमी केली असती तर कदाचित सिनेमाचा प्रभाव पडला असता. सिनेमाची सुरुवात धमाकेदार होते. त्यानंतर मात्र श्रद्धा आणि प्रभासच्या लव्हस्टोरीत मुख्य सिनेमा हरवत जातो. या प्लॉटची सिनेमात खरंच एवढी गरज होती का ? जर त्यांच्या लव्हस्टोरीवर एवढा फोकस न करता मूळ विषयावरच हा सिनेमा राहिला असता तर सिनेमाची लांबी अजून कमी झाली असती असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घर करतात.

‘बाहुबली’ सीरिज यशस्वी ठरल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी प्रभासचा सिनेमा येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये सिनेमाची प्रचंड क्रेझ होती. या सिनेमात प्रभासने पडदा व्यापून टाकलाय. सिनेमाभर त्याच्यावरुन नजर हटत नाही, पण या सिनेमात प्रभासचा ‘बाहुबली’वाला चार्म बघायला नाही मिळत. प्रभासची हिंदीत डब केलेली संवादफेक शेवटपर्यंत तुम्हाला खटकेल. ही या सिनेमाची सगळयात कमकुवत बाजू आहे असं मला वाटतं. चित्रपटात प्रभास सुपरहिरो असल्याचा भास तुम्हाला वारंवार होत राहतो. कारण एकटा प्रभास 100 जणांना मारतो, सुसाट वेगाने गाडी पळवतो, उंच इमारतींवरुन उड्या मारतो तरी त्याला काही होत नाही. त्याच्या कपड्यावरही चांगलाच खर्च करण्यात आलाय.

श्रद्धा कपूरने आपला कम्फर्ट झोन सोडून वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पात्राला सिनेमात योग्य न्याय मिळालेला नाही. तिला सशक्त पोलीस अधिकारी दाखवण्याऐवजी वारंवार हिरोला वाचवणारी कॉप वूमन दाखवल्यामुळे तिचा प्रभाव पडत नाही. तसेच सिनेमात तिची आणि प्रभासची केमिस्ट्रीही मिसिंग वाटते. नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, मंदिरा बेदी हे सगळे तगडे कलाकार सिनेमात प्रभासचाच प्रभाव जास्त जाणवत असल्यामुळे दबले जातात. चंकी पांडेने साकारलेला देवराज मात्र चांगला भाव खातो.

सिनेमाचं संगीतही निराश करतं. या सिनेमातील एकही गाणं लक्षात राहत नाही. त्यातल्या त्यात ‘सायको सैया’ जरा बरं झालंय. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. एकूणच काय तर तुम्ही प्रभासचे डाय हार्ड फॅन असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी ट्रीट आहे. अन्यथा हा सिनेमा पाहून ‘बाहुबली’ने प्रभासने जे कमावलं त्यावर ‘साहो’ ‘कलंक’ लावून गेला असंच म्हणाव लागेल. टीव्ही 9 मराठीकडून या सिनेमाला दोन स्टार्स.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.