Raj Kundra Case | अश्लील चित्रपट प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामिन मंजूर

अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना जमीन मंजूर झाल आहे.

Raj Kundra Case | अश्लील चित्रपट प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामिन मंजूर
राज कुंद्रा


मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना जमीन मंजूर झाल आहे. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली होती. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगात राहिलेले उद्योगपती राज कुंद्रा यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचे पती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अ‍ॅपद्वारे प्रदर्शित करणे यासारख्या गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आली होती. आता राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपासून तुरुंगात

अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी (19 जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही.

राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले होते.

यूजर्स वाढवण्याची योजना

दैनिक भास्करनं दिलेल्या बातमीनुसार राज कुंद्रानं 2 वर्षात त्याच्या अ‌ॅपचे यूजर्स तीन पट वाढवण्याचं आणि फायदा 8 पट वाढवण्याचा प्लॅन तयार केला होता. तो त्याच्या 119 फिल्मचं कलेक्शन 8.84 कोटी रुपयांना विकणार होता. राज कुंद्राचं पहिलं अ‌ॅप हे अ‌ॅपल स्टोअर वरुन हटवण्यात आलं होत त्यानंतर त्यानं दुसरं अ‌ॅप बनवलं होतं. कुंद्रााला डिजीटल मीडियाच्या माध्यमातून अवैधरित्या पैसे कमवायचे होते. मात्र, ज्यावेळी मुंबई पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळताच त्याच्या प्लॅनचा भांडाफोड झाला आहे. यानंतर त्यानं सर्व माहिती डिलीट करुन स्वत: या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न केला होता.

राज कुंद्राला संपूर्ण डाटा डिलीट केल्यानंतर पोलीस त्याच्या पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असं वाटलं होतं. पोलिसांनी राज कुंद्राला पहिल्यांदा नोटीस पाठवली होती, तेव्हा तो म्हणाला “मी आरोपी आहे का?, मी या पत्रावर सही करणार नाही” अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात राज कुंद्रानं त्यांना योग्य माहिती दिली नाही, उडवाउडवीची उत्तर देत होता, असा उल्लेख करण्यात आला आहे.

राज कुंद्राच्या कार्यालायतून 24 हार्ड डिस्क जप्त

राज कुंद्राच्या कार्यालयातून 24 हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये 35 चित्रपट पोलिसांना सापडले आहेत. दुसऱ्या संगणकामध्ये, पोलिसांना 16 चित्रपट मिळाले आहेत, जेथे दुसऱ्या संगणकावरून 60 पेक्षा जास्त चित्रपट आणि PPT सापडले आहेत, ज्यामुळे राज यांचा प्लॅन उघड होत आहे. राज कुंद्रा व्यतिरिक्त इतर आरोपींच्या संगणक आणि मोबाईलवरुन अॅपची सामग्री, खर्च, उत्पन्न आणि भविष्यातील योजनांसह इतर महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राज कुंद्राचे कर्मचारी पोलीस साक्षीदार बनले

राज कुंद्रा याच्या विहान एंटरप्रायजेसमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. हे कर्मचारी या कार्यालयाच्या आयटी आणि लेखा विभागाचा भाग राहिले आहेत.

हेही वाचा :

Defamation Case : कंगना रनौतने शिवसेनेवर साधला निशाणा, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला!

Thalapathy Vijay | थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI