दिवसाढवळ्या अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकू हल्ला, आरोपीला वसईतून अटक

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकू हल्ला करणाऱ्या माथेफिरु आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दिवसाढवळ्या अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकू हल्ला, आरोपीला वसईतून अटक

मुंबई : अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकू हल्ला करणाऱ्या माथेफिरु आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला वसईतील एका रुग्णालयातून अटक केली. आरोपीने योगेश कुमारने माल्वीवर मुंबईतील वर्सोवा भागात दिवसाढवळ्या चाकूने हल्ला केला होता. तसेच तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा शोध आधीच लागला होता, मात्र रुग्णालयात दाखल असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मात्र, आता अखेर आरोपीला अटक झाली आहे (Mumbai Police arrest Accused of Actress Malvi Malhotra Attack in Mumbai).

आरोपी योगेश कुमारवर मुंबई पोलिसांनी कलम 307, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री माल्वी मल्होत्रा मुंबईच्या वर्सोवा भागातील CCD रेस्टॉरन्टमधून परतत असताना आरोपी ऑडी कारने तेथे आला. त्याने माल्वीला आपल्यासोबत येण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर आरोपी योगेशने तिच्यावर चाकूने तीन वेळा हल्ला केला. त्याने माल्वीच्या चेहऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माल्वीने हे वार आपल्या हातावर घेतल्याने चेहऱ्याला दुखापत झाली नाही, मात्र हातांना गंभीर जखमा झाल्या.

दरम्यान, माल्वी मल्होत्रावर अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी योगेशचा मोबाईल, लॅपटॉपवरुन त्याचा शोध घेतला तेव्हा तो वसईत असल्याचं आढळलं. यानंतर पोलिसांनी आरोपीचा वसईत शोध घेतला. आरोपी योगेश एका रुग्णालयात भरती असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी त्याला एक दिवस उपचार घेऊ दिले आणि आज अटक केली.

आरोपी योगेशच्या अटकेनंतर जखमी अवस्थेतील अभिनेत्री माल्वीने समाधान व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, “2 दिवसांपासून मला झोपही येत नव्हती. कधीही माझ्यावर पुन्हा हल्ला होईल अशी भीती वाटत होती. अशात आरोपी योगेशला अटक झाल्याने मी आनंदी आहे आणि मुंबई पोलिसांचे आभार मानते. आरोपीला कठोर शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा करते.”

संबंधित बातम्या :

Malvi Malhotra Attack | कंगनाने माझ्याविरुद्धच्या अन्यायात साथ द्यावी, हल्ल्यात जखमी अभिनेत्री माल्वीचं आवाहन

अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा चाकू हल्ला, चेहऱ्यावरही वार करण्याचा प्रयत्न

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

Mumbai Police arrest Accused of Actress Malvi Malhotra Attack in Mumbai

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *