मुंबईः ‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी चहूबाजूंनी टीका होत आहे. या चौफेर टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली होती. परंतु तरीसुद्धा हा वाद शमण्याचं काही नाव घेत नाहीये. आता मुंबई पोलिसांनीही तांडव वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल केलाय. आयपीसीचा कलम 153 (A) 295((A) 505 IPC अंतर्गत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Mumbai Police FIR Against Tandav Web Series)
विशेष म्हणजे भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच राम कदम यांनी तिथे सरकारविरोधात नारेबाजीसुद्धा सुरू केली होती. त्यावेळी पोलिसांकडून राम कदम यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता वेब सिरीज तांडवविरोधात घाटकोपर पोलिसांनी 153 अ, 295 अ, भादंवि 505 अंतर्गत सैफ अली खानसह Amazon आणि तांडवच्या टीमविरोधात FIR दाखल केलाय.
वेब सिरीज तांडवविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, आमदार राम कदम यांनी या विरोधात गेले 3 दिवस आंदोलन केलं होतं. अभिनेता सैफ अली खान, अली अब्बास जफर, हिमांशू कृष्ण मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहित, अमित अगरवाल, झीशान वेब मालिकेतील अन्य कलाकार दिग्दर्शक, लेखक आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे तांडव वेब सीरिजशी संबंधित चार जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, मुंबई हायकोर्टाने हा जामीन मंजूर केलाय. तांडव वेब सीरिजबाबत गुन्हा दाखल झालाय. उत्तर प्रदेश येथे पहिला गुन्हा दाखल झालाय. वेब सीरिजचा डायरेक्ट अली अब्बास जाफरसह काही जणांवर हा गुन्हा दाखल झालाय. यामुळे चार जणांना मुंबई हायकोर्टात तात्पुरत्या अटकपूर्व जामिनासाठी आज अर्ज केला होता. त्याचा अर्ज मंजूर झालाय. संबंधित कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत हा अर्ज मंजूर झालाय.
अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सिरीज विरोधात अनेक तक्रारी दाखल होत होत्या. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन काढून हिंदू संघटनांची माफी मागितली होती. तरीही तांडवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलीस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आता घाटकोपर पोलिसांनी 153 अ, 295 अ, भादंवि 505 अंतर्गत सैफ अली खानसह Amazon आणि तांडवच्या टीमविरोधात FIR दाखल केलाय.
निर्मात्याने काय म्हटलं
ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवंत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं होतं.
अॅमेझॉनच्या उत्तराची प्रतिक्षा
जफर यांनी माफी मागितली असली तरी अजूनही अॅमेझॉनवर ही सीरिज दाखवली जात आहे. या सीरिजचे सर्व हक्क अॅमेझॉनकडे आहेत. त्यामुळे सरकार आणि आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी अॅमेझॉनवर असून अॅमेझॉन काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
‘तांडव’ विरोधातील ठिय्या आंदोलन पोलिसांनी उधळलं, आमदार राम कदम ताब्यात
‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…
Mumbai Police FIR Against Tandav Web Series