नागराजसाठी बिग बी नागपूर मुक्कामी!

नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेसाठी हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन हे नागपुरात मुक्काम ठोकणार आहेत. बिग बींच्या नागपूर मुक्कामाला कारणही तसेच आहे. नागराजच्या आगामी ‘झुंड’ सिनेमाचं शूटिंग आता नागपुरात होणार आहे. त्यासाठी बिग बी काही दिवस नागपुरात राहायला येणार आहेत. झुंडचं शूटिंग नागपुरात होणार असून, त्यासाठी अमिताभ बच्चन नागपुरात वास्तव्यास येतील, याबाबत माहिती दिग्दर्शक …

नागराजसाठी बिग बी नागपूर मुक्कामी!
नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेसाठी हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन हे नागपुरात मुक्काम ठोकणार आहेत. बिग बींच्या नागपूर मुक्कामाला कारणही तसेच आहे. नागराजच्या आगामी ‘झुंड’ सिनेमाचं शूटिंग आता नागपुरात होणार आहे. त्यासाठी बिग बी काही दिवस नागपुरात राहायला येणार आहेत.
झुंडचं शूटिंग नागपुरात होणार असून, त्यासाठी अमिताभ बच्चन नागपुरात वास्तव्यास येतील, याबाबत माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळेनेच दिली. ‘नाळ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोमवारी नागराज मंजुळेने नागपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने झुंडच्या शूटिंगसंदर्भातही माहिती दिली.
गेल्या वर्षी पुणे येथे ‘झुंड’च्या निर्मात्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट उभारला होता. मात्र, तिथे वाद झाल्याने निर्मात्यांनी सेट नागपुरात हलवला. नागपुरात ‘झुंड’चं 45 दिवस शूटिंग चालणार आहे.
झुंडचं शूटिंग नागपुरात होणार असल्याला आणखी एक विशेष महत्त्वं आलं आहे. ते म्हणजे, झुंड चित्रपटाची कथा नागपूरचे फूटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बोरस्ते यांच्या जीवनावर आधारलेली आहे.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *