राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची परवड, ‘म्होरक्या’ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही

अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'म्होरक्या'ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची परवड, 'म्होरक्या'ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 9:03 AM

मुंबई : अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘म्होरक्या’ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे (Mhorkya No Screen). अनंत अडचणींवर मात करुन ‘म्होरक्या’ चित्रपट 7 फेब्रुवारीला म्हणजेच आज प्रदर्शित होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला कुणी थिएटर देता का थिएटर म्हणण्याची वेळ आली आहे (Marathi Movie Mhorkya). निर्माता आणि प्रेझेंटर यांच्यातील वाद आणि समन्वयाअभावी म्होरक्याला थिएटर मिळाले नाही, असा आरोप आहे.

निर्माता आणि प्रेझेंटर यांच्यातील वाद आणि समन्वयाअभावी म्होरक्याला थिएटर मिळाले नाही, असं म्हटलं जात आहे. सगळ्या थिएटरला डीसी गुरुवारी गेल्यामुळे म्होरक्याला थिएटर मिळालं नाही. नियमानुसार, डीसी बुधवारी पोहोचायला हवी होती. मात्र, निर्मात्याने हलगर्जीपणा केल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा आरोप दिग्दर्शकाने केला आहे. म्होरक्याला महाराष्ट्रात शनिवारी एकूण 35 शो मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, चार मराठी, तीन हिंदी, इतर भाषेतील काही चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. तसेच, तान्हाजी आणि स्ट्रीट डान्सर हे चित्रपट अजूनही सिनेमागृहांमध्ये तग धरुन आहेत. त्यामुळे म्होरक्याच्या शोवर गदा आली आहे, असंही म्हटलं जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके शो या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाला मिळाले आहेत. ही मोठी शोकांतिका आहे.

मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात शो न मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘भाई’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही निर्माता-दिग्दर्शकांना झगडावं लागत होतं.

हेही वाचा :  Movie Review Mhorkya : प्रत्येकामध्ये दडलेला असतो एक ‘म्होरक्या’

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.