Drugs Case | एनसीबीची मोठी कारवाई, भारती-हर्षला ड्रग्ज पुरवणाऱ्या तस्कराला अटक

एनसीबीने बुधवारी रात्री वांद्रे जंक्शन परिसरात कारवाई करून एक किलो 250 ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सुनील गवई या व्यक्तीला अटक केली आहे.

Drugs Case | एनसीबीची मोठी कारवाई, भारती-हर्षला ड्रग्ज पुरवणाऱ्या तस्कराला अटक
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 11:02 AM

मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. आता एनसीबीने या दोघांना ड्रग्ज पुरवणाऱ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे (NCB Arrest Durg peddler). एनसीबीने बुधवारी रात्री वांद्रे जंक्शन परिसरात कारवाई करून एक किलो 250 ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सुनील गवई या व्यक्तीला अटक केली आहे. सुनील गवई हा भारतीला आणि हर्षला ड्रग्ज पुरवायचा (NCB Arrest Durg peddler who supplies drugs to bharti singh and harsh limbachiyaa).

याबाबत 37/2020 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला ड्रग्ज व्यापारी हा अनेक बॉलिवूड अभिनेते आणि टीव्ही सिरीयल मधील कलाकारांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या अनुषंगाने आता पुढील तपास सुरू झाला आहे. या ड्रग्ज तस्काराकडे दीड किलो गांजा मिळाला आहे.

डिलिव्हरी बॉय बनून पोलिसांना चकमा

अटक करण्यात आलेला हा ड्रग्ज व्यापारी हा बॅगमध्ये ड्रग्ज ठेवायचा आणि दिवसभर अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला परिसरात फिरायचा. जशी जशी ड्रग्सची ऑर्डर येईल तसे तो त्या ठिकाणी जाऊन ड्रग्जची डिलिव्हरी द्यायचा. त्या ड्रग्सचे पैसे गुगल पे, फोन पे आदी पेमेंट ऑपशनद्वारे स्वीकारायचा. फूड डिलिव्हरी बॉय बनून तो पोलिसांना चकवत होता. मात्र, एनसीबीने धडक कारवाई करत आता त्याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले (NCB Arrest Durg peddler who supplies drugs to bharti singh and harsh limbachiyaa).

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.

आधीच समन्स बजावले होते…

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली होते.

कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याला जामीन अर्जाला मंजुरी मिळाली असून, सध्या ते जामिनावर सुटले आहेत.

(NCB Arrest Durg peddler who supplies drugs to bharti singh and harsh limbachiyaa)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.