Drugs Case | बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात 34 जणांना अटक, भारतीच्या रक्त तपासणीचे वृत्त खोटे, एनसीबी अधिकाऱ्यांचा दावा

गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनी केवळ भारती सिंहची रक्त तपासणी केल्याचे बोलले जात होते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचा निर्वाळा एनसीबीने दिला आहे.

Drugs Case | बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात 34 जणांना अटक, भारतीच्या रक्त तपासणीचे वृत्त खोटे, एनसीबी अधिकाऱ्यांचा दावा
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 1:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचा आरोप सतत होत आहे. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी शबाना सईद, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यासारख्या कलाकारांची चौकशी केली आहे. तर, या प्रकरणात आतापर्यंत 34 लोकांना अटक करण्यात आली आहे. तथापि, ड्रग्ज पार्श्वभूमीवर यापैकी कोणाचीही रक्त तपासणी (Blood Test) केली गेली नव्हती, असा निर्वाळा एनसीबी अधिकाऱ्यांनी दिला आहे (NCB did not conduct Blood test of Bharti Singh in drugs Case).

गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनी केवळ भारती सिंहची रक्त तपासणी केल्याचे बोलले जात होते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचा निर्वाळा एनसीबीने दिला आहे. यासंदर्भात एनसीबी अधिकाऱ्यांनी एका वेबसाईटशी बातचीत केली आहे. यादरम्यान त्यांनी हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. तसेच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

सर्वांना नियम सारखेच!

एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ड्रग्ज प्रकरणात सहसा आरोपींची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. अटक होण्यापूर्वी नियमांप्रमाणे केवळ हृदयाची गती तपासली जाते. माध्यमांमध्ये या प्रकरणी संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, भारती सिंहची रक्त तपासणी केली गेली, हे वृत्त खोटे आहे. असे काहीही झालेले नाही. दीपिका, सारा, श्रद्धा, अर्जुन यांनाही हेच नियम लागू आहेत. धर्मा प्रोडक्शनचे संचालक-निर्माते क्षितीज प्रसाद यांना अटक झाल्यानंतर त्याचीही रक्त तपासणी केली गेली नाही. क्षितीज प्रसादवर 16/20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ (NCB did not conduct Blood test of Bharti Singh in drugs Case)

आरोप सिद्ध कसा होणार?

रक्ताची तपासणी होत नाही, मग आरोपींचा गुन्हा कसा सिद्ध होईल?, असे विचारले असता अधिकारी म्हणतात, ‘जेव्हापासून एनडीपीएस कायदा (National Domestic Preparedness Consortium amendment 2014) अस्तित्वात आला आहे, तेव्हापासून कोणाचीही रक्त तपासणी झालेली नाही. रक्त तपासणीला मान्यता नाही. केवळ काही निवडक ड्रग्ज प्रकरणांमध्ये काही राज्यांनी रक्त तपासणीचा निर्णय घेतलेला असू शकतो. परंतु, हा प्रकार सध्या बंद करण्यात आला आहे. भारतीची केसमध्ये किरकोळ ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तिच्यावर ड्रग्ज कंजप्शनचा आरोप आहे. ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या आरोपीची रक्त तपासणी करावी हा या तपासाचा भाग नाही.’ (NCB did not conduct Blood test of Bharti Singh in drugs Case)

रक्त तपासणीशी न्यायालयाचा संबंध नाही..

अधिकारी म्हणाले, ‘रक्त चाचणीचा रिपोर्ट, चाचणी याचा न्यायालयीन कारवाईशी संबंध नाही. जर आरोपींकडून विशिष्ट प्रमाणात मादक द्रव्ये हस्तगत केली तर तो देखील गुन्हा मानला जातो. याप्रकरणी काही केसेसमध्ये रक्त तपासणी केली गेली आहे. परंतु, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या बाबतीत, अद्याप असे काहीही घडलेले नाही.’

(NCB did not conduct Blood test of Bharti Singh in drugs Case)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.