अभिनेत्री नेहा धुपियाला कन्यारत्न

मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदीने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि बाळ दोघांचीही तब्येत ठीक आहे. नेहा आणि अंगद यांनी सहा महिन्यापूर्वीच लग्न केलं होतं. ऑगस्ट महिन्यात नेहा गर्भवती असल्याचं वृत्त समोर आलं होतं. नेहा लग्ना आधीच गर्भवती …

अभिनेत्री नेहा धुपियाला कन्यारत्न

मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदीने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि बाळ दोघांचीही तब्येत ठीक आहे. नेहा आणि अंगद यांनी सहा महिन्यापूर्वीच लग्न केलं होतं. ऑगस्ट महिन्यात नेहा गर्भवती असल्याचं वृत्त समोर आलं होतं. नेहा लग्ना आधीच गर्भवती असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होती. या बाबत दोघांनीही ऑगस्ट महिन्यात कबुली दिली.

नेहा आणि अंगद या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा गर्भवती असल्याचा फोटो शेअर केला होता, ज्यात नेहा ही बेबी बंपमध्ये दिसून आली.

नेहा आणि अंगद यांनी याच वर्षी मे महिन्यात अचानकपणे लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या गडबडीत लग्न करण्यामागे नेहा गर्भवती असणे हेच कारण होतं. नेहा ही लग्नाआधीच गर्भवती होती, याची माहिती तिने स्वतःच एका शोमध्ये दिली.

नेहाने काहीच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक असा व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती अंगदचा इंटरव्ह्यू घेतं आहे. या इंटरव्ह्यू दरम्यान अंगद अगदी बिनधास्तपणे आपल्या खासगी आयुष्यातील गुपितं सांगत आहे. याच दरम्यान त्याने सांगितले की, नेहा ही लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती. जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली तेव्हा घरच्यांनी त्यांना रागावले होते.

नेहा आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान माध्यमांमध्ये खूप चर्चेत होती. कारण ती गर्भवती असल्यावर देखील पूर्णपणे अॅक्टिव्ह होती. ती सांगते की, तिला प्रेग्नन्सी लिव्ह घेणे योग्य वाटत नाही, तर तिला तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करायला आवडेल. आता मुलीला जन्म दिल्यानंतर नेहा आणि अंगदच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s to new beginnings … #3ofUs …. ?? #satnamwaheguruੴ

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

 

View this post on Instagram

 

Ha! Turns out this rumor is true.. #3ofus ?? #satnamwaheguruੴ

A post shared by Angad Bedi (@angadbedi) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *