नेहा धुपियाने मुलीचं नाव ठेवलं......

मुंबई : बॉलिवूड किड्स स्टारमध्ये सर्वात क्यूट म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर-खान यांचा मुलगा ‘तैमूर’ ओळखला जातो. मात्र, क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री नेहा धुपिया आणि मॉडल अंगद बेदी यांची मुलगी ‘मेहर’ आली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला आहे. यात ती क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देताना दिसत …

नेहा धुपियाने मुलीचं नाव ठेवलं......

मुंबई : बॉलिवूड किड्स स्टारमध्ये सर्वात क्यूट म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर-खान यांचा मुलगा ‘तैमूर’ ओळखला जातो. मात्र, क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री नेहा धुपिया आणि मॉडल अंगद बेदी यांची मुलगी ‘मेहर’ आली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला आहे. यात ती क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला टक्कर देताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने अंगदसोबत लग्न केल्यानंतर सहा महिन्यातच मुलीचा जन्म दिला. नेहाने रविवारी सोशल मीडियावर तिच्या पायांचा फोटो शेअर केला होता. यावेळी मुलीचं ‘मेहर’ असं नाव ठेवल्याचं सांगितलं होते.

 

View this post on Instagram

 

Mehr Dhupia Bedi says hello to the world … ❤️

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

विशेष म्हणजे, या फोटोमध्ये मेहरचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र, नेहाचे सासरे आणि अंगदचे वडिल बिशन बेदी यांनी आपल्या नातेचा गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

नेहा लग्नाआधीच गर्भवती असल्याने कोणालाही न सांगता लग्न केलं होतं. याबाबत नेहाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये नेहा अंगदचा इंटरव्ह्यू घेतांना अंगदने नेहा लग्नापूर्वीच गर्भवती असल्याचा खुलासा केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *