Nia Sharma | निया शर्माची हँडबॅग गाडीतून चोरी, मदतीसाठी मुंबई पोलिसांना विनंती!

बुधवारी प्रवासादरम्यान निया शर्माची हँडबॅग तिच्या गाडीतून चोरीला गेली आहे. मुंबईच्या लोअर परळमधील एका सिग्नलवर ही घटना घडली आहे.

Nia Sharma | निया शर्माची हँडबॅग गाडीतून चोरी, मदतीसाठी मुंबई पोलिसांना विनंती!

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) नेहमीच तिच्या हटके लुक्समुळे चर्चेत असते. परंतु, आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी प्रवासादरम्यान निया शर्माची हँडबॅग तिच्या गाडीतून चोरीला गेली (Bag Stolen) आहे. मुंबईच्या लोअर परळमधील एका सिग्नलवर ही घटना घडली आहे. ही घटना घडताच क्षणी तिने मदतीसाठी मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे. (Nia Sharma’s bag get stolen from car actress seeks help from Mumbai police)

यासंदर्भात नियाने ट्विट करत मुंबई पोलिसांची मदत महितली आहे. ‘लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील सिग्नलवरून, माझ्या गाडीतून हँडबॅग चोरीला गेली आहे. मुंबई पोलीस मला मदत करा’, अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

सतर्क मुंबई पोलिसांचे उत्तर

नियाने ट्विट करत पोलिसांची मदत मागितल्यावर मुंबई पोलिसांनी देखील लगेच उत्तरादाखल ट्विट केले आहे. नियाने स्वतःच्या बॅगचा फोटोदेखील शेअर केला होता. यावर मुंबई पोलिसांनी उत्तर देत म्हटले की, ‘आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. लवकरच तुम्हाला मदत केली जाईल’, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या या सतर्कतेचे नियाने कौतुक केले आहे. (Nia Sharma’s bag get stolen from car actress seeks help from Mumbai police)

निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकताच तिचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ अभिनेता रवी दुबे आणि सर्गून मेहता यांच्या घरातील एका पार्टी दरम्यानचा आहे. यात निया त्यांच्या मोलकरणीसह धमाल डान्स करताना दिसली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, निया शर्मा शेवट ‘नागिन 4’मध्ये जास्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या मालिकेत नियाने इच्छाधारी नागिणीची भूमिका केली होती. दरम्यानच्या काळात निया ‘खतरोके खिलाडी’मध्ये देखील सहभागी झाली होती. या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत तिने ट्रॉफीवर आपले नव कोरले होते.(Nia Sharma’s bag get stolen from car actress seeks help from Mumbai police)

मीडिया रिपोर्ट्सनुसार निया लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अद्याप तिने याबदल कुठलीच जाहीर वाच्यता केलेली नाही. निया शर्माला तिच्या स्टाईललिस्ट लूकमुळे आशियातील मादक महिलांच्या यादीत ‘तिसरा’ क्रमांक मिळाला होता. नुकताच प्रदर्शित झालेला नियाच्या ‘ट्विस्टेड’ या वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.

(Nia Sharma’s bag get stolen from car actress seeks help from Mumbai police)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *