शुक्रवारी नऊ मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार

मुंबई : बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात एक-दोन नाही, तर तब्बल नऊ चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही अशी ओरड नेहमीच होत असते. पण स्वत: मराठी चित्रपट निर्मातेच याला जबाबदार असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. कारण, नऊ चित्रपट एकाच वेळी रिलीज होत असल्याने थिएटरचं गणित जुळवायचं कसं असा प्रश्न वितरकांसमोर उभा […]

शुक्रवारी नऊ मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात एक-दोन नाही, तर तब्बल नऊ चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही अशी ओरड नेहमीच होत असते. पण स्वत: मराठी चित्रपट निर्मातेच याला जबाबदार असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. कारण, नऊ चित्रपट एकाच वेळी रिलीज होत असल्याने थिएटरचं गणित जुळवायचं कसं असा प्रश्न वितरकांसमोर उभा राहिलाय.

या शुक्रवारी भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध, आसूड, दहावी, लकी, प्रेमरंग, प्रेमवारी, रेडिमिक्स, उनाड मस्ती, धरपड हे सिनेमे रिलीज होतील. यामध्ये नामांकित निर्मात्यांचे चित्रपट आहेतच, पण काही नवख्या निर्मात्यांनीही याचदिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचा अट्टहास धरलाय. पण हा अट्टाहास सगळ्यांच्याच गळ्याशी येण्याची शक्यता आहे. कारण, एकदम एवढे चित्रपट सोबत प्रदर्शित होणार म्हटल्यावर थिएटर मिळत नाही अशी ओरड पुन्हा एकदा केली जाण्याची शक्यता आहे.

मागच्या आठवड्यातही तब्बल पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. आधीच प्राईम टाईम शो मिळावा म्हणून हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपटांची रस्सीखेच सुरु आहे आणि त्यातच मराठी चित्रपट निर्मात्यांचा असा गोंधळ असणं, आपसातच रस्सीखेच सुरु असणं खरोखरचं घातक आहे. प्रेक्षकांनाही आता नेमका कोणता सिनेमा बघावा असा संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे चित्रपट निर्माते भविष्यात तरी जागे होतील आणि असा गोंधळ टाळतील अशी आशा करायला हरकत नाही.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.