झायराच नाही तर 'या' अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

बॉलिवुड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकमेव अभिनेत्री नाही. तिच्याप्रमाणेच अन्य काही अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलेला आहे.

, झायराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

मुंबई : अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवुडमधून एक्झिट केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. दंगल चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या झायराने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. झायराने हा निर्णय घेण्यामागील कारणे आपल्या इंस्ट्राग्रामवर सांगितली. ती म्हणाली, “मागील 5 वर्षांपासून बॉलिवुडमध्ये आहे. मात्र, या कामाविषयी मी आनंदी नाही. या कामामुळे आपल्या धार्मिक श्रद्धेत अडचण होत आहे.” मात्र, झायरा असा निर्णय घेणारी एकमेव अभिनेत्री नाही. तिच्याप्रमाणेच अन्य काही अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलेला आहे.

आयेशा कपूर

, झायराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

संजय लीला भंसाळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणाची भूमिका करणाऱ्या आयशा कपूरच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. मात्र, आयशाने केवळ 2 चित्रपट केले आणि त्यानंतर बॉलिवुड सोडण्याचा निर्णय घेतला.

आयेशा टाकिया

, झायराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

आयशा टाकिया तिच्या सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील भूमिकेनंतर चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने ‘डोर’ चित्रपटात आपल्या सशक्त अभिनयाने आपले वेगळे स्थानही निर्माण केले. दरम्यान, आयेशाने समाजवादी पक्षाचे नेते आबु आझमीचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले. त्यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा केला. त्यावेळी देखील तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

मयुरी कांगो

, झायराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

 

‘पापा कहते हैं’ या 1996 च्या चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ या गाण्याने मयुरी कांगोची मोठी चर्चा झाली. यामध्ये तिने केलेल्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले. मयुरीने या व्यतिरिक्त 1995 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘नसीम’मध्येही काम केले होते. तिने 1997 मध्ये आलेल्या ‘बेताबी’ आणि 2000 मध्ये आलेल्या ‘बादल’ चित्रपटातही काम केले. यानंतर तिने आपल्या करिअरचा दुसरा मार्ग निवडत कॉर्पोरेट क्षेत्रात पदार्पण केले आणि बॉलिवुडला अलविदा केला.

मयुरी कांगो यांनी डिसेंबर 2003 मध्ये अनिवासी भारतीय आदित्य ढिल्लन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केलं आहे. मयुरी कांगो या नुकत्याच गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून 4 एप्रिल 2019 रोजी रुजू झाल्या आहेत. मयुरीने यांनी याआधी परफोर्मिक्स रिझल्टट्रिक्स (Performix Resultrix) या डिजीटल मार्केटिंग एजेन्सीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी नेस्ले, उबर, एअरटेल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केले आहे.

ममता कुलकर्णी

, झायराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींनीही अचानक बॉलिवुडला अलविदा केलाय

ममता कुलकर्णीने 90 च्या दशकात बॉलिवुडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. ममताने आपल्या ग्लॅमर अवताराने चाहत्यांना वेड लावले होते. दरम्यान, 2000 मध्ये तिने बॉलिवुडला रामराम ठोकला. त्यामुळे अनेक चाहते नाराजही झाले. यानंतर ती मोठा काळ चर्चेत नव्हती. मात्र, 15 वर्षांनंतर ती केनिया येथे असल्याचे वृत्त आले. ती आपल्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगिनी’ या आत्मचरित्रानंतरही बरीच चर्चेत आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *