या 15 ऑगस्टला 3 मोठ्या सिनेमांची टक्कर

येत्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी स्पर्धा आपल्या पाहायला मिळणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

या 15 ऑगस्टला 3 मोठ्या सिनेमांची टक्कर

मुंबई : येत्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी स्पर्धा आपल्या पाहायला मिळणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ (Mission Mnagal), अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ (Batala House) आणि हॉलिवूड चित्रपट ‘वन्स अपॉन टाईम ईन हॉलिवूड’चा (Once Upon time in a Hollywood) समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही चित्रपटांमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने कोणता चित्रपट अधिक कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. गेल्यावर्षीही स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांमध्येही मोठी टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यंदा हॉलिवूडचे दोन बडे स्टार ब्रॅड पिट आणि लिओनार्डो डिकॅप्रियोंचा चित्रपटही 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याने मोठी स्पर्धा तिन्ही चित्रपटाच्या कमाईत दिसणार आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी साहो, बाटला हाऊस आणि मिशन मंगल चित्रपट प्रदर्शित होणार होते. पण साहोच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत बदल करत 30 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. यामुळे मिशन मंगल आणि बाटला हाऊसमध्ये टक्कर होणार असल्याचे दिसत होते. पण हॉलिवूड चित्रपटाच्या एण्ट्रीमुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

हॉलिवूड चित्रपट वन्स अपॉन टाईम ईन हॉलिवूड 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तारखेत बदल करत 15 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अभिनेता ब्रॅड पिट आणि लिओनार्डो डिकॅप्रयोसारखे मोठे सुपरस्टार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *