Binge Watch | ‘स्कॅम 1992’ ते ‘महाराणी’, खऱ्याखुऱ्या घटनांवर आधारित ओटीटीवरील ‘या’ सीरीजनी वेधले चाहत्यांचे लक्ष!

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युगात प्रेक्षकांसाठी कोणताही कंटेंट कधीही पुरेसा नसतो. निर्मात्यांना मूळ चित्रपट आणि वेब सीरीजच्या कंटेंटवर सतत विचार करावा लागतो, जो प्रेक्षकांना व्यस्त ठेवू शकेल. यातच एक थीम यात गाजली ती म्हणजे ‘घोटाळे’. घोटाळ्यांच्या खऱ्या कथांवर आधारित चित्रपट आणि वेब सीरीज गुन्हेगारी आणि ड्रामाचे एक मनोरंजक कॉकटेल तयार होते.

Binge Watch | ‘स्कॅम 1992’ ते ‘महाराणी’, खऱ्याखुऱ्या घटनांवर आधारित ओटीटीवरील ‘या’ सीरीजनी वेधले चाहत्यांचे लक्ष!
ओटीटी सीरीज
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 10:13 AM

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युगात प्रेक्षकांसाठी कोणताही कंटेंट कधीही पुरेसा नसतो. निर्मात्यांना मूळ चित्रपट आणि वेब सीरीजच्या कंटेंटवर सतत विचार करावा लागतो, जो प्रेक्षकांना व्यस्त ठेवू शकेल. यातच एक थीम यात गाजली ती म्हणजे ‘घोटाळे’. घोटाळ्यांच्या खऱ्या कथांवर आधारित चित्रपट आणि वेब सीरीज गुन्हेगारी आणि ड्रामाचे एक मनोरंजक कॉकटेल तयार होते. लॉकडाऊन दरम्यान अशा अनेक शो आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे (Binge Watch OTT Series and films based on true story).

आकर्षक आणि मनोरंजक सामग्री तयार करण्यासाठी विविध डिजिटल प्रवाह प्लॅटफॉर्मने या डार्क स्टोरींमध्ये प्रवेश केला आहे. असे विषय लोकांना भुरळ घालतात. घोटाळ्यांवर आधारित आणखी बऱ्याच सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, सध्या प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज आणि चित्रपटांनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  1. स्कॅम 1992

यापूर्वी घोटाळ्याच्या इतरही कथा प्रदर्शित झाल्या होत्या. परंतु, हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम 1992’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही सीरीज सुचेता दलाल आणि देबाशिष बसू या पत्रकारांद्वारे लिहिले गेलेले पुस्तक ‘द स्कॅम हू वोन, हू लॉस्ट, हू गॉट अवे’ यावरून ही सीरीज तयार केली आहे. ही सीरीज 2020ची सर्वात मोठी हिट सीरीज ठरली. अभिनेता प्रतीक गांधी यांने यात ‘हर्षद मेहता’ची भूमिका साकारली होती.

  1. आश्रम

प्रकाश झाच्या ‘आश्रम’ या सीरीजच्या दोन हंगामांनी प्रेक्षकांमध्ये खूप रस निर्माण केला. एमएक्स प्लेअरवर प्रेक्षक तिसऱ्या हंगामाची वाट पाहत आहेत. या सीरीजमध्ये बॉबी देओलने ‘बाबा निराला काशीपूरवाले’ची भूमिका साकारली आहे.

  1. महारानी

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या सीरीजमध्ये  अभिनेत्री हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असून, ही सीरीज 1990च्या बिहार राजकारणावर आधारित आहेत. वृत्तानुसार, ही सीरीज वादग्रस्त चारा घोटाळ्यावरून प्रेरित असून लालूप्रसाद यादव यांनी पद सोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राबडी देवी यांच्या कार्यकाळांवर आधारित आहे.

  1. जामथारा

नवीन कलाकारांच्या टोळीने ही सीरीज पुढच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे. या नेटफ्लिक्सच्या सीरीजमधून जामथारा या छोट्या गावात सुरु झालेला क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा गुन्हा कसा उघडकीस आला, ते दाखवण्यात आले आहे. ही काल्पनिक सीरीज खऱ्या घटनांनी प्रेरित आहे.

  1. बिग बुल

अभिषेक बच्चन अभिनीत हर्षद मेहताच्या घोटाळ्यावरील आणखी एक चित्रपट ‘द बिग बुल’ देखील हिट ठरला. या चित्रपटात त्याची लव्ह लाईफ, मेलोड्रामा आणि गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.

(Binge Watch OTT Series and films based on true story)

हेही वाचा :

Films on OTT | ओटीटी प्लॅटफार्मवर मनोरंजनाची मेजवानी, आठवड्यात प्रदर्शित ‘या’ वेब सीरीज आणि फिल्म्स!

Samantar 2 trailer out | एकाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य, नियती होणार का नियंत्रित? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त ट्रेलर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.