घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच ‘सानिया मिर्झा’च्या जुन्या अफेअरबद्दल जोरदार चर्चा

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Nov 10, 2022 | 11:17 AM

काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने तर चर्चांना तोंड फुटले.

घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच 'सानिया मिर्झा'च्या जुन्या अफेअरबद्दल जोरदार चर्चा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यामध्ये काहीतरी बिनसल असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघे लवकरच घटस्फोट घेऊन विभक्त होणार असल्याचे देखील कळते आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने तर चर्चांना तोंड फुटले. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने सुरू असतानाच सानियाने यावर कुठलेच भाष्य न केल्याने शंका उपस्थित केलीये जातंय. याच दरम्यान आता सानिया मिर्झाचा काॅफी विथ करण या शोमधील जुना एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

काॅफी विथ करण या शोमध्ये नेहमीच करण जोहर पर्सनल लाईफ विषयी प्रश्न विचारतो. सानिया मिर्झा आणि फराह खान काॅफी विथ करणमध्ये सहभागी काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यावेळी करण जोहरने सानिया मिर्झाला विचारले होते की, तू शाहिद कपूरला डेट केले आहेस का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुझे आणि शाहिदचे नाव जोडले जातंय. यावरील सानियाचे उत्तर ऐकून सर्वचजण आर्श्चयचकित झाले होते.

शाहिदसोबतच्या डेटींगवर बोलताना सानिया करण जोहरला म्हणते की, मला याबद्दल काही आठवत नाही कारण मी खूप जास्त प्रवास करते. आता शोएबसोबतच्या घटस्फोटच्या चर्चेमध्ये हा सानियाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. करिना कपूरसोबत शाहिदचे ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद सानियाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. इतकेच नाही तर अनेकदा यांना स्पाॅट देखील केले गेले होते. मुंबईतील एका हाॅटेलबाहेरही शाहिद आणि सानिया स्पाॅट झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर सानिया आणि शाहिदमध्ये ब्रेकअप झाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI