Samantar 2 | ‘समांतर 2’ दिसणार डबल धमाका, ‘दुहेरी’ सई वाढवणार कुमार महाजनच्या आयुष्यातील गुंतागुंत!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना सईची झलक पाहायला मिळाली आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

Samantar 2 | ‘समांतर 2’ दिसणार डबल धमाका, ‘दुहेरी’ सई वाढवणार कुमार महाजनच्या आयुष्यातील गुंतागुंत!
समांतर 2
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 7:03 AM

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या एमएक्स ओरिजनलच्या ‘समांतर’ या वेब शोने प्रत्येक एपिसोडमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली, जिथे प्रेक्षक सीझन 2 ची आतुरतेने वाट पाहू लागले. ही प्रतीक्षा आता संपली असून ‘समांतर 2’ (Samantar 2) जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सई ताम्हणकर (Saie Tamhankar) या प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवेश होणार असून, ती कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसणार आहे (Samantar 2 latest update Actress Saie Tamhankar will be seen in double role).

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना सईची झलक पाहायला मिळाली आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नुकतेच सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या रहस्याने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.

पाहा धमाकेदार प्रोमो :

‘समांतर 1’ मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सीझन 2मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे. यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध यंदाच्या 10 भागांच्या थ्रिलरमध्ये दिसणार आहे.

कुमारचा प्रवास अनपेक्षित वळणावर!

‘समांतर 2’बद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणतो, ”प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन ‘समांतर’ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शोने आपलंस केलंय. ‘समांतर’चा पहिला सीझन येऊन आता वर्ष उलटले असून, मला माहित आहे की, प्रेक्षक आता सीझन 2ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सीझन 2 मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यात हा प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?” हा वेबशो मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना 1 जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

(Samantar 2 latest update Actress Saie Tamhankar will be seen in double role)

हेही वाचा :

Films on OTT | ओटीटी प्लॅटफार्मवर मनोरंजनाची मेजवानी, आठवड्यात प्रदर्शित ‘या’ वेब सीरीज आणि फिल्म्स!

‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.