मोदी ही काळाची गरज, भाजपला मतदान करा, 900 पेक्षा जास्त कलाकार मैदानात

मुंबई : जवळपास 900 पेक्षा जास्त कलाकार मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय, पंडीत जसराज, रिता गांगुली यांनी पत्रक जारी करत देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार देण्यासाठी भाजपला मतदान करावं, असं आवाहन केलंय. यापूर्वी 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करावं, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या …

मोदी ही काळाची गरज, भाजपला मतदान करा, 900 पेक्षा जास्त कलाकार मैदानात

मुंबई : जवळपास 900 पेक्षा जास्त कलाकार मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय, पंडीत जसराज, रिता गांगुली यांनी पत्रक जारी करत देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार देण्यासाठी भाजपला मतदान करावं, असं आवाहन केलंय. यापूर्वी 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करावं, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या समर्थनार्थही कलाकार मैदानात उतरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हे काळाची गरज आहे. सर्वांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावं. दहशतवादासारखे मुद्दे जेव्हा आपल्यासमोर असतात, तेव्हा आपल्याला मजबूर नाही, तर मजबूत सरकारची गरज असते. त्यामुळेच सध्याच्या सरकारचीच आपल्याला पुढेही गरज आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.

भाजपच्या समर्थनार्थ उतरलेल्या कलाकारांमध्ये गायक शंकर महादेवन, त्रिलोकी नाथ मिश्रा, कोईना मित्रा, गायिका अनुराधा पौडवाल आणि हंसराज यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षात देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि विकासासाठी प्रयत्नशील सरकार मिळालंय, असं या पत्रकात म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं, ज्यात अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, उषा गांगुली यांच्या नावाचा समावेश होता.

संबंधित बातमी : भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *