Payal Ghosh | ‘मी अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत’, पायल घोषचे पुन्हा पंतप्रधान मोदींना साकडे!

पायलने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ‘मला न्याय द्या’, अशी मागणी केली आहे.

Payal Ghosh | ‘मी अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत’, पायल घोषचे पुन्हा पंतप्रधान मोदींना साकडे!
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 4:47 PM

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) बलात्काराचा आरोप करणार्‍या अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ‘मला न्याय द्या’, अशी मागणी केली आहे. पायलने पुन्हा एकदा ट्विट करत अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग केले आहे (Payal Ghosh says Anurag Kashyap maligned her equation with her co-star).

या ट्विटमध्ये तिने म्हटले की, ‘माझ्या मित्राने आणि व्यवस्थापकाने अनुराग कश्यपला माझा चित्रपट (ओस्रावेली) संदर्भ म्हणून पहायला सांगितला होता. कारण भविष्यात आम्ही एक प्रोजेक्टवर काम करणार होतो. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटणार देखील होतो. मात्र, अनुराग कश्यप यांनी कोणतेही सत्य विचारात न घेता माझे आणि सहकलाकार ज्युनिअर एनटीआर यांच्यातील संबंध खराब केले होते. मी अजूनही न्यायाची वाट पाहत आहे.’ या ट्विटमधून तिने पुन्हा एकदा न्यायाची मागणी केली आहे.

माफिया माझी हत्या करतील!

या आधीही पायलने एका ट्विटद्वारे पीएम मोदींकडे मदत मागितली होती. या ट्विटमध्ये तिने म्हटले होते की, ‘ही माफिया गँग माझी हत्या करेल आणि वरुन ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सिद्ध करतील’. पायलने या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांना टॅग केले होते. (Payal Ghosh says Anurag Kashyap maligned her equation with her co-star)

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. याशिवाय तिने पोलिस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती.

अनुराग कश्यपची तब्बल 8 तास चौकशी

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अनुराग कश्यपची वर्सोवा पोलीस स्थानकात तब्बल आठ तास चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या बलात्कार आणि इतर सर्व आरोपांचे खंडन केले. पायल घोषला (Payal Ghosh) मी फक्त प्रोफेशनली ओळखतो. त्याशिवाय, गेल्या अनेक काळापासून माझे पायलशी बोलणेही झाले नसल्याचे, अनुरागने पोलिसांना सांगितले.

(Payal Ghosh says Anurag Kashyap maligned her equation with her co-star)

संबंधित बातम्या : 

Payal Ghosh | पायल घोषच्या ‘बिनशर्त’ माफीला उच्च न्यायालयाची मंजुरी, ऋचाकडून ‘मानहानी’ केस रद्द!

इरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा

Payal Ghosh | पायल घोषची ‘टीवटीव’ पुन्हा सुरू, रिचा चड्ढाच्या वकिलावर नवा आरोप!

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.