क्वॉन्टिटी विरुद्ध क्वॉलिटी, ‘ठग्ज’पेक्षा मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ भारी!

दीपाली राणे म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने हिंदीत आमीर –अमिताभ स्टारर बिग बजेट सिनेमा ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां‘ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यासोबतच सुबोध भावे स्टारर मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ हा सिनेमाही रिलीज झाला. आता बहुचर्चित 240 कोटींचं बजेट असणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां’ आणि मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ सिनेमामध्ये स्पर्धा रंगणार […]

क्वॉन्टिटी विरुद्ध क्वॉलिटी, 'ठग्ज'पेक्षा मराठमोळा 'काशीनाथ घाणेकर' भारी!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

दीपाली राणे म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने हिंदीत आमीर –अमिताभ स्टारर बिग बजेट सिनेमा ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां‘ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यासोबतच सुबोध भावे स्टारर मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ हा सिनेमाही रिलीज झाला. आता बहुचर्चित 240 कोटींचं बजेट असणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां’ आणि मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ सिनेमामध्ये स्पर्धा रंगणार हे तर जाहीर होतं.

एक नट घडायला आणि बिघडायला त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कशी कारणीभूत ठरते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. काशीनाथ घाणेकर हा सिनेमा. या सिनेमातून डॉ.घाणेकरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या रेखाटलेत. सिनेमा जरी सबकुछ सुबोध भावे असला तरी सिनेमाचं श्रेय लेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांना जातं.

तर दुसरीकडे आमिर-अमिताभ या जोडीच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये 1795 मधला भारत दाखवलाय.हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी याच्या व्हीएफएक्स इफेक्टसची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष सिनेमा पाहिल्यानंतर यात काहीही दम नसल्याचं दिसून आलं.या सिनेमाची सगळ्यांत मोठी उणीव ती म्हणजे याची लांबी. कदाचित हा सिनेमा कमी खेचला असता तर आणखी प्रभावी बनू शकला असता.

वाचा –  ठग्स ऑफ हिंदोस्तान ची HD प्रिंट लीक  

समीक्षकांनी देखील ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाचा रिव्ह्यू चांगला दिलेला नाही. ‘चमकणाऱ्या सर्व वस्तू सोनं नसतात’ अशा वाक्यात समीक्षकांनी या सिनेमावर टीका केली.

या दोन सिनेमांमधून कोणता सिनेमा हिट ठरणार हा प्रश्नच आहे.. ‘काशीनाथ घाणेकर’ या सिनेमाला बिग बजेट ठग्स ऑफ हिंदोस्तान पेक्षा’ जास्त पसंती मिळतेय असंच प्रेक्षकांच्या प्रतिसादावरुन दिसून येतंय.

आमिर-अमिताभ यांच्या ‘ठग्सने प्रेक्षकांची घोर निराशा केली असली तरी बॉक्स ऑफीसवर मात्र पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई करत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरलाय.तेव्हा आता या विकेंडपर्यंत बॉक्स ऑफीस कलेक्शनमध्ये कोणत्या सिनेमाचं पारडं जड होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

संबंधित बातम्या

ठग्स ऑफ हिंदोस्तान बेकार, तरीही कमाईत रेकॉर्ड

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.