जोनास कुटुंबात गुड न्यूज, लवकरच पाळणा हलणार

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

जोनास कुटुंबात गुड न्यूज, लवकरच पाळणा हलणार
Follow us
| Updated on: Feb 14, 2020 | 2:59 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. कारण जोनास कुटुंबामध्ये लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची पत्नी सोफी टर्नर हे आई-वडील होणार आहेत. त्यामुळे प्रियंका आणि निकही लवकरच काका-काकू होणार आहेत (Priyanka Chopra sister in law Sophie turner pregnant).

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी टर्नर 4 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आपण आई होणार या बातमीने सोफी खूप खूश झाली आहे. याशिवाय जो देखील तितकाच आनंदी झाला आहे. दोघांनी ही बातमी आपल्या कुटुंबियांनी सांगितली आहे. ही बातमी ऐकताच घरातलेही आनंदी झाले आहेत. त्यामुळे जोनस कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी मे 2019 मध्ये लास वेगास येथे गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये धामधूमीत लग्न केलं. जोनास कुटुंबिय आणि नातेवाईक यांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं होतं (Priyanka Chopra sister in law Sophie turner pregnant).

जो आणि सोफी ग्रॅमी अवॉर्ड शो 2020 मध्ये एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात जो याने निक आणि केविनच्या मदतीने आपलं नवं गाणं What A Man Gotta Do या गाण्याचं सादरीकरण केलं होतं. या कार्यक्रमात प्रियंका चोप्राही उपस्थित होती.

प्रियंकाचा पती निक जोनास आणि त्याचे भाऊ जो जोनास आणि केविन जोनास नेहमीच चर्चेत राहतात. म्यूझिक बँड जोनास ब्रदर्स नावाच्या कंपनीत ते एकत्र काम करतात. जोनर्स ब्रदर्सची सध्या हॅपीनेस बिगिन्स टूर सुरु आहे. या म्यूझिक टूरमार्फत ते युरोपात विविध कार्यक्रमात व्यस्त आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.