बेडरुममध्ये फोटोग्राफर लपलाय का? प्रियांका चोप्रा ट्रोल

बेडरुममध्ये फोटोग्राफर लपलाय का? प्रियांका चोप्रा ट्रोल

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गेल्यावर्षी शाही विवाहसोहळा जोधपूरमध्ये पार पडला. त्यावेळी प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस दोघांचीही सर्वत्र चर्चा सुरु होती. मात्र यावर्षी प्रियांका आणि निक सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत, या बद्दलचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. लग्नानंतर दोघं अनेकदा बाहेर फिरायला गेले आहेत. तर सध्या हे दोघं कॅलीफोर्नियामध्ये विंटर हॉलीडेचा आनंद लूटत आहेत. मात्र एका फोटोमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

प्रियांकाने आपल्या पतीसोबतचा बेडरुममधला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये निकच्या खांद्यावर प्रियांका डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे, तर निक जोनस टीव्ही पाहत आहे. प्रियांकाने फोटो कॅप्शनमध्ये ‘होम’ असं लिहिलं आहे. मात्र हे फोटो पब्लिक प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने युजर्सला आवडले नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

एका युजर्सने वाईट कमेंट केली आहे. तुमच्या बेडरुममध्ये फोटोग्राफर लपलेला आहे. दुसऱ्याने लिहलं आहे की, हे लोक प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफर घेऊन फिरतात. बेडरुममधील फोटो शेअर केल्याने एका युजर्सने कमेंट केली, “एवढे जास्त एक्सपोज नको होऊस. तुम्हाला नाही माहित भविष्य काय आहे. कधी कधी प्रायव्हसीची गरज असते”.

प्रियांकाचा हा फोटो फक्त ट्रोल होत नसून त्यावर चांगल्या कमेंटही येत आहेत. चाहत्यांनी मेड फॉर ईच अदर, स्वीट, ब्यूटीफुल, क्यूट यांसारख्या कमेंट केल्या आहेत. प्रियांका लवकरच ‘द स्काय इज पिंक’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. 13 फेब्रुवारीला प्रियांकाचा हॉलीवूड चित्रपट ‘इज नॉट इट रोमँटिक’ प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट भारतात 28 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *