प्रियांका-निकच्या लग्नापूर्वी वऱ्हाडींमध्ये क्रिकेट सामना!

मुंबई: अभिनेते रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. प्रियांका आणि निक हे 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नानंतर 4 डिसेंबरला दिल्लीत ग्रँड रिसेप्शन होणार आहे.  हे बहुचर्चित लग्न …

प्रियांका-निकच्या लग्नापूर्वी वऱ्हाडींमध्ये क्रिकेट सामना!

मुंबई: अभिनेते रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. प्रियांका आणि निक हे 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नानंतर 4 डिसेंबरला दिल्लीत ग्रँड रिसेप्शन होणार आहे.  हे बहुचर्चित लग्न राजस्थानमध्ये होत आहे. लग्नाच्या कार्यक्रमात एक खास इव्हेंट ठेवण्यात आला आहे. हा इव्हेंट आहे वर आणि वधू पक्षामध्ये क्रिकेट सामन्याचा.

डीएनएच्या वृत्तानुसार, आज वर आणि वधू पक्षाच्या कुटुंबात क्रिकेट मॅच खेळवली जाणार आहे. P आणि N या नावाचे दोन संघ बनवण्यात आले आहेत.

पाहुण्यांसाठी नियमावली

प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी खास नियमावली बनवण्यात आली आहे. कोणताही पाहुणा आपल्यासोबत कॅमेरावाला मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. त्यांचा फोन घेऊन त्यांना एक टोकन नंबर दिला जाईल, लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर टोकन परत घेऊन मोबाईल दिला जाईल. लग्न सोहळ्यादरम्यान पाहुण्यांना एक विना कॅमेऱ्याचा मोबाईल दिला जाईल, तोच ते वापरु शकतात.

संगीत सोहळ्याला मुकेश अंबानींची हजेरी

दरम्यान, प्रियांका आणि निकच्या लग्नापूर्वी शुक्रवारी संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानीही सहकुटुंब उपस्थित होते. पत्नी नीता, मुलगा अनंत आणि मुलगी इशासह ते विमानतळावर दिसले.

प्रियांकाचं लग्न होत असलेला उमेद भवन थ्री डी लायटिंगने सजवण्यात आला आहे.  लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एकूण 64 आलिशान रुम्स, 22 पॅलेस रुम आणि 42 स्वीट्स बुक केले आहेत. उमेद भवनचं चार दिवसाचं भाडं तब्बल 4 कोटीपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे.  संगीत सोहळ्याची थीम राजस्थानी ठेवण्यात आली आहे.

प्रियांकाच्या पाहुण्यांच्या यादीत देशी आणि विदेशी पाहुण्यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *