Naxalbari | राजीव खंडेलवालची बहुप्रतीक्षिती ‘नक्षलबारी’ वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

‘नक्षलबारी’ या बहुप्रतीक्षित आणि लवकरच येऊ घातलेल्या वेब सीरीजची निर्मितीमागील कथाही अनोखी आहे.

Naxalbari | राजीव खंडेलवालची बहुप्रतीक्षिती ‘नक्षलबारी’ वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

मुंबई : अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ची निर्मिती असलेली बहुप्रतीक्षित वेब सीरीज ‘नक्षलबारी’ (Naxalbari) लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण जग हे स्तिमित झालेले असताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ने मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीसाठी एक वेगळा मार्ग धुंडाळला आणि आपल्या वेब सीरीजचे गोवा येथे चित्रीकरण पूर्ण केले. राजीव खंडेलवालची ही वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Rajeev Khandelwal’s Naxalbari web series shooting completed).

‘नक्षलबारी’ या बहुप्रतीक्षित आणि लवकरच येऊ घातलेल्या वेब सीरीजची निर्मितीमागील कथाही अनोखी आहे. निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आता कशाप्रकारे हिंदी वेब सीरीजच्या क्षेत्रात उडी घेत आहेत त्याचीसुद्धा ही एक आगळी कहाणी आहे.

(Rajeev Khandelwal’s Naxalbari web series shooting completed)

‘नक्षलबारी’चा टीझर प्रदर्शित

निर्मात्यांनी या वेब सीरीजचा एक टीझर नुकताच प्रकाशित केला आहे. त्यावरुन या वेब सीरीजच्या कथेची आणि एकूण हाताळणीचा अंदाज प्रेक्षकांना येतो. ‘नक्षलबारी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेब सीरीज या चळवळीचा आणि लढ्याचा जवळजवळ प्रत्येक कंगोरा समोर आणते. त्यात मग आदिवासी आणि या गावकऱ्यांची त्यांच्या हक्कांपासून होणारी कुचंबना, ज्या नैसर्गिक संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाणे किंवा राजकारणी व उद्योजक यांच्याकडून त्यांच्या हक्काच्या गोष्टींमधील मलिदा उकळला जाणे या सर्व बाबी या मालिकेत येतात. या ट्रेलरमधून ही कथा नेमकी काय आहे, याबद्दलचा ढोबळ अंदाज बांधता येतो. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी ताणली गेली आहे (Rajeev Khandelwal’s Naxalbari web series shooting completed).

(Rajeev Khandelwal’s Naxalbari web series shooting completed)

 ‘जीसिम्स’चे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण

‘नक्षलबारी’ ही ‘जीसिम्स’ची पहिली वेब सीरीज असून लवकरच ती ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे.‘जीसीम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अंड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) ही भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या प्रत्येक घटकामध्ये कार्यरत आहे. त्यात चित्रपट, टेलिव्हिजन, वेब सीरीज, निर्मिती, टॅलेंट व्यवस्थापन आणि सॅटेलाइटसमूहन यांचा समावेश होतो. आता कंपनीने नव्या जमान्याच्या विषयांच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे.

‘नक्षलबारी’चे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक पार्थ मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

(Rajeev Khandelwal’s Naxalbari web series shooting completed)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *