‘2.0’ ची प्रदर्शनापूर्वी तब्बल 490 कोटींची कमाई  

मुंबई :  सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुप्रतीक्षित ‘2.0’ या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली आहे. या 490 कोटींमध्ये ‘2.0’ ने 120 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग तर 370 कोटी रूपयांचे सॅटेलाईट राईट्सचा समावेश आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 2.0 चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचा विक्रम केला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 500 कोटी रुपयांचं होतं. […]

‘2.0’ ची प्रदर्शनापूर्वी तब्बल 490 कोटींची कमाई  
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई :  सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुप्रतीक्षित ‘2.0’ या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली आहे. या 490 कोटींमध्ये ‘2.0’ ने 120 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग तर 370 कोटी रूपयांचे सॅटेलाईट राईट्सचा समावेश आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 2.0 चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचा विक्रम केला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 500 कोटी रुपयांचं होतं. त्यामुळे 2.0 ने  प्रदर्शनापूर्वीच 490 कोटींची कमाई केली आहे.

या आधी 2.0 च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. 29 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या नॉदर्न बेल्ट प्रोडक्सन हाऊसने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ राज्यांना डिस्ट्रिब्यूशन राईट्स विकले आहेत. 490 कोटींची कमाई केली असताना ही  नॉदर्न बेल्ट प्रोडक्शनने तमिळनाडूत डिस्ट्रिब्यूशन राईट्स विकलेले नाही. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ते राईट्स विकल्याने चित्रपटाला मोठा फायदा होणार आहे.

370 कोटींच्या राईट्सपैकी 60 कोटींचे राईट्स हे डिजिटल स्वरूपातले आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 490 कोटींची कमाई केलेल्या 2.0 चित्रपटाचा सर्व खर्च वसूल झाला आहे.

असे आहेत सर्व राईट्स :

सॅटेलाईट राईट्स : 120 कोटी

डिजिटल राईट्स : 60 कोटी

नॉर्थ बेल्ट राईट्स : 80 कोटी

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राईट्स : 70 कोटी

कर्नाटक राईट्स : 25 कोटी

केरळ राईट्स : 15 कोटी

अशाप्रकारे 370 कोटींची राईट्स आणि 120 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. त्यामुळे आता प्रदर्शनानंतर 2.0 किती कोटींची भरारी घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.