मुलीच्या लग्नात रजनीकांतचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:53 PM, 11 Feb 2019
मुलीच्या लग्नात रजनीकांतचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

चेन्नई : साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा आज लग्न सोहळा पार पडला. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने विशागन वानागमुदीसोबत लग्न केलं. या दोघांचंही दुसरं लग्न आहे. या लग्नसोहळ्याआधी प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये रजनीकांत यांनी धमाकेदार डान्स केला. सध्या रजनीकांत यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्री-वेडिंग पार्टीमध्ये कुटुंबाने खूप मस्ती केली. तर रजनीकांत यांच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

सौंदर्यानेही आपल्या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी सौंदर्या निळ्या आणि गोल्ड सिल्क साडीमध्ये दिसत आहे, तर विशागन वानागमुदी पांढरा शर्ट आणि धोतीमध्ये दिसत आहे.

फोटो – रजनीकांतच्या मुलीच्या लग्नातील काही खास फोटो

रिसेप्शन दरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांनी काळा कुर्ता, तर त्यांची पत्नी लता ग्रीन रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. यावेळी रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्यानेही आपल्या पतीसोबत या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. काही दिवसांआधीच सौंदर्याने आपल्या लग्नाबद्दलची माहिती ट्विटरवर दिली होती. यासोबतच तिने आपला एक फोटोही ट्विटरवर शेअर केला होता. ज्यामध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत होती.

तिने फोटो शेअर करताना कॅप्शनही दिले होते. तसेच रजनीकांतच्या घरी लग्नानंतर एक पूजाही ठेवण्यात आली आहे. गेल्या गुरुवारी रजनीकांत अभिनेता कमल हसनलाही भेटला आणि त्याला सैंदर्याच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते.

सौंदर्याचं दुसरं लग्न

सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी उद्योगपती अश्वीन रामकुमार याच्याशी सौंदर्याने लग्न केलं होतं. मात्र, 2016 मध्ये सौंदर्याने अश्वीन रामकुमार याच्याशी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2017 च्या अखेरीस ते दोघेही वेगळे झाले. अश्वीन रामकुमार याच्यापासून सौंदर्याला ‘वेद’ नावाचा मुलगा आहे.

कोण आहे विशगन वानानगामुडी?

विशागन वानागमुदीचा जन्म 4 सप्टेंबर 1983 रोजी चेन्नई येथे झाला. बंगळुरु येथून त्याने मास्टर ऑफ बीझिनेसमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विशागन वनानगामुडी हा उद्योगपती आणि अभिनेता आहे. फार्मास्युटिकल कंपनीचा तो मालक आहे. काही सिनेमांमध्येही विशागनने काम केले आहे. विशागन याचेही हे दुसरे लग्न आहे. याआधी एका मासिकाची संपादिका कनिका कुमारन हिच्यासोबत विशागन विवाहबद्ध झाला होता.

विशागन हा एका फार्माकंपनीचा डायरेक्टर आहे. गेल्यावर्षी 2018 मध्ये त्याने तामिळ चित्रपट वंजागर उलागमधून साऊथ इंडियन चित्रपट सृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली.

विशागन वानागमुदीचे पहिलं लग्न कनिका कुमारनसोबत झाले होते. दोघांमध्ये वाद होत असल्यामुळे विशागन आणि कनिकाने काही वर्षापूर्वी घटस्फोट घेतला.

संबंधित बातम्या 

रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न