रजनीकांतच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर लाँच

मुंबई :  दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘पेट्टा’ सिनेमाचा तेलगू ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाचा तामिळ ट्रेलर 27 डिसेंबरला रिलीज करण्यात आला होता. रजनीकांतच्या ‘पेट्टा’ सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. एकाच दिवसात या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पेट्टा’ सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री तृषा, अभिनेत्री सिमरन बग्गा, अभिनेता बॉबी सिम्हा, …

Rajnikanth, रजनीकांतच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर लाँच

मुंबई :  दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘पेट्टा’ सिनेमाचा तेलगू ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाचा तामिळ ट्रेलर 27 डिसेंबरला रिलीज करण्यात आला होता. रजनीकांतच्या ‘पेट्टा’ सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. एकाच दिवसात या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पेट्टा’ सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री तृषा, अभिनेत्री सिमरन बग्गा, अभिनेता बॉबी सिम्हा, अभिनेता विजय सेथूपती हे मुख्य भूमिकेत आहेत.

नववर्षाच्या निमित्ताने रजनीकांतच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. ‘पेट्टा’ रजनीकांत यांचा 165 वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात  अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पेट्टा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रजनीकांत 90 च्या दशकातील लूक मध्ये दिसून येत आहेत. यात ते खूप यंग दिसत आहेत. त्यांचं आयकॉनिक सिग्नेचर स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे.

दिग्दर्शक कार्तिक आर्यन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचं शुटिंग उत्तराखंडमध्ये झालं. या सिनेमाच्या माध्यमातून रजनीकांतचा गँगस्टर लूक पुन्हा एकदा चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *