पुन्हा ‘मी टू’चं वादळ, राजकुमार हिरानींवर लैगिंक शोषणाचा आरोप

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैगिंक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप 2018 साली आलेल्या ‘संजू’ सिनेमाच्या एका सहदिग्दर्शिकेने केला आहे. हिरानी यांनी या सिनेमादरम्यान सहा महिन्यांपर्यंत लैगिंक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. हे लैगिंक शोषण संजू सिनेमाच्या प्रॉडक्शन […]

पुन्हा 'मी टू'चं वादळ, राजकुमार हिरानींवर लैगिंक शोषणाचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैगिंक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप 2018 साली आलेल्या ‘संजू’ सिनेमाच्या एका सहदिग्दर्शिकेने केला आहे. हिरानी यांनी या सिनेमादरम्यान सहा महिन्यांपर्यंत लैगिंक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. हे लैगिंक शोषण संजू सिनेमाच्या प्रॉडक्शन दरम्यान झाल्याचंही तिने सांगितले. तर राजकुमार हिरानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पीडित महिलेने ‘संजू’ सिनेमाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही ई-मेल करत याबाबतची माहिती दिली. यासोबतच तिने विधू विनोद चोप्रा यांची पत्नी अनुपमा चोप्रा, पटकथा लेखक अभिजात जोशी, विधू विनोद चोप्रा यांची बहिण आणि निर्माती शेली चोप्रालाही याबाबत तक्रार केली.

हफिंगस्टन पोस्टच्या वृत्तानपसार, राजकुमार हिरानी यांनी त्यांचे वकील आनंद देसाई यांच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. “राजकुमार हिरानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे, निराधार असून त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचन्यात आले आहे. त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हा कट रचला गेला आहे”, असे देसाई यांनी सांगितले.

पीडित महिलेने ई-मेलमध्ये लिहिले की, “राजकुमार हिरानी यांनी 9 एप्रिल 2018 ला माझ्याबाबत अश्लील वक्तव्य केलं. त्यानंतर राजकुमार यांनी ऑफिस आणि घरी लैगिंक छळ केला. तेव्हा मला शांत राहाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता, कारण मला नोकरीची चिंता होती.”

बॉलीवूड लाईफच्या वृत्तानुसार, जेव्हा राजकुमार हिरानींना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काहीही उत्तर न देता त्या महिलेसोबतच्या संभाषणांचे स्क्रीन शॉट दाखवले.

विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांनी आपल्याला मेल मिळाल्याचे स्पष्ट केले. “मी पीडितेला दोनदा भेटली आहे, मी तिला मदतीचे आश्वासनही दिले. तसेच मी तिला यासंबंधी पोलिसांची मदत घेण्याचंही सुचवले.”

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैगिंक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर बॉलीवूडमध्ये ‘मी टू’चं वादळ उठू लागलं. या दरम्यान अनेक महिलांनी सेलीब्रिटींवर लैगिंक छळाचा आरोप केला होता. मात्र लैगिंक शोषणाचा आरोप करण्यात आलेले राजकुमार हिरानी हे बॉलीवूडमधील सर्वात मोठे नाव आहे.

राजकुमार हिरानी हे बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांनी मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई, 3 इडियट्स, पीके, संजू यांसारखे सिनेमांचे दिग्दर्शन केले. हिरानी यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.