Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुतण्याने दिले तब्येतीचे अपडेट्स

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, राजू यांच्या हाताच्या बोटांची हालचाल सुरू आहे. याशिवाय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडूनही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुतण्याने दिले तब्येतीचे अपडेट्स
Raju SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:47 AM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांच्यावर अद्याप दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल सातत्याने अपडेट्स येत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते सातत्याने प्रार्थना करत आहेत. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या कुशल श्रीवास्तव याने त्यांच्या आरोग्याबद्दलची ताजी माहिती शेअर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, राजू यांच्या हाताच्या बोटांची हालचाल सुरू आहे. याशिवाय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडूनही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.

“अफवा पसरवणं थांबवा”

कुशल श्रीवास्तव यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केलं असून राजू यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. त्यांनी सांगितलं की डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि सर्वोत्तम उपचार देत आहे. आम्ही लोकांना खोट्या अफवा आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यापासून रोखू इच्छितो. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका

राजू श्रीवास्तव यांचं कुटुंब शनिवारी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये पोहोचलं होतं. गुरुद्वारामध्ये त्यांनी राजू हे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.