रणवीरच्या ‘83’ सिनेमाचं पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीखही ठरली

रणवीरच्या ‘83’ सिनेमाचं पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीखही ठरली

मुंबई : ‘पद्मावत’, ‘गल्ली बॉय’ सारखे हिट सिनेमे दिल्यानंतर आता अभिनेता रणवीर सिंग हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर सेंचुरी मारण्याच्या तयारीत आहे. रणवीर एका महान क्रिकेटच्या भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘83’ मध्ये तो भारताचे माजी कर्णधार आणि देशाला क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. रणवीरने नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं. यामध्ये रणवीर त्याच्या सिनेमामातील क्रिकेट संघासोबत पोज देताना दिसला.

या पोस्टरमध्ये संघाचे सर्व खेळाडू हे अत्यंत उत्साही असल्याचं दिसत आहे. या पोस्टरवर “1 YEAR TO’ 83” असं लिहिलेलं आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर हा कपिल देव यांची भूमिका साकारण्यात किती यशस्वी ठरतो, याकडे बॉलिवूडचं तसेच त्याच्या चाहत्यांचंही लक्ष लागून आहे. या सिनेमात माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर राज भसीन साकारणार आहेत.


या सिनेमासाठी रणवीरला खुद्द कपिल देव क्रिकेटचे धडे देत आहेत. यादरम्यानचे धर्मशाळा येथील काही फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये कपिल देव हे रणवीरला काही टिप्स देताना दिसले. या सिनेमामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. रणवीर हा कपिल देव यांच्याकडून क्रिकेट शिकत असल्याने त्याला कपिल देव यांच्या सानिध्यात राहून त्यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या भूमिकेत उतरवण्यात मदत होणार आहे.

या सिनेमामध्ये रणवीर सिंगसोबत चिराग पाटील, साकीब सलीम, पंकज त्रिपाठी, हार्डी संधू हे मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *