चाहत्यांचा वैताग, पोलीस बंदोबस्तात रिंकूला बारावीची परीक्षा द्यावी लागणार!

सोलापूर : सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु बारावीची परीक्षा देणार आहे. राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. मात्र रिंकूला चाहत्यांचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. रिंकूला चाहत्यांचा त्रास झाल्याच्या घटना याअगोदरही अनेकदा घडल्या आहेत. रिंकूला पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी महाविद्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. रिंकू सोलापूर जिल्ह्यातील …

चाहत्यांचा वैताग, पोलीस बंदोबस्तात रिंकूला बारावीची परीक्षा द्यावी लागणार!

सोलापूर : सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु बारावीची परीक्षा देणार आहे. राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. मात्र रिंकूला चाहत्यांचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. रिंकूला चाहत्यांचा त्रास झाल्याच्या घटना याअगोदरही अनेकदा घडल्या आहेत.

रिंकूला पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी महाविद्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. रिंकू सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीतील एका महाविद्यालयात बारावीची परीक्षा देणार आहे. रिंकूच्या चाहत्यांनी यापूर्वी अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यामुळे महाविद्यालयाने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त मागितलाय.

वाचा महाराष्ट्राची ‘आर्ची’ रिंकू राजगुरु सध्या काय करते?

सैराट सिनेमाच्या यशानंतर रिंकूने दहावीत 66 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. पण सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु झाल्यामुळे तिचं हे स्वप्न बदलून गेलं. तरीही तिने शिक्षणाकडे पाठ फिरवलेली नाही. रिंकूने शाळा सोडून बाहेरुन बारावी परीक्षेसाठी बोर्डाकडे फॉर्म भरला होता. त्यानुसार तिचा बैठक क्रमांक टेंभुर्णीतील परीक्षा केंद्रावर आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *