‘कांतारा 2’ सिनेमासाठी चाहत्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार ? ऋषभ शेट्टी याच्याकडून मोठी घोषणा

कांतारा सिनेमाच्या यशानंतर ‘कांतारा 2’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार? असा प्रश्न प्रत्येक चाहता विचारता आहे. आता ‘कांतारा 2’सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे.

‘कांतारा 2’ सिनेमासाठी  चाहत्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार ? ऋषभ शेट्टी याच्याकडून मोठी घोषणा
‘कांतारा 2’ सिनेमासाठी चाहत्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार ? ऋषभ शेट्टी याच्याकडून मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 2:47 PM

Rishab Shetty On Kantara 2 : कोणत्याही सिनेमाचा पहिला भाग हीट झाल्यानंतर चाहते सिक्वलच्या प्रतीक्षेत असतात. ‘कांतारा’ सिनेमाच्या कथेने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही सिनेमाबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. ‘कांतारा’ सिनेमाच्या पहिल्या भागानंतर चाहते ‘कांतारा 2’साठी उत्सुक आहेत. ‘कांतारा 2’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार? असा प्रश्न प्रत्येक चाहता विचारता आहे. आता ‘कांतारा 2’सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. ‘कांतारा 2’ सिनेमाबद्दल ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी माहिती दिली आहे. एवढंच नाही तर, दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांने महत्त्वाची घोषणा केली आहे.

ऋषभ शेट्टी यांनी सांगितलं की ‘कांतारा 2’ सिक्वल नसून प्रिक्वेल सिनेमा असणार आहे. ‘कांतारा ’ सिनेमाच्या यशानंतर सिनेमाच्या सिक्वलच्या चर्चांनी जोर धरला होता. आता दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने सिनेमाबद्दल मोठी घोषणा केली आहे. ‘कांतारा 2’ चा सिक्वल येणार नसून प्रिक्वेल येणार आहे. म्हणजे ‘कांतारा 2’मध्ये पहिल्या सिनेमचीच कथा दाखवण्यात येणार आहे.

सध्या सर्वत्र कांतारा सिनेमाची चर्चा जोर धरत आहे. कांतारा सिनेमाबद्दल ऋषभ शेट्टी याने एका मुलाखतीत खुलासा केला, तर दुसरीकडे तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. प्रसिद्ध सिनेमांपैकी एक असणाऱ्या कांतारा सिनेमाचं प्रिक्वेल येणार आहे. असं तरण आदर्श यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

सांगायचं झालं तर, ‘कांतारा’ सिनेमाच्या १०० दिवसांच्या यशानंतर एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टी उपस्थित होता. या कार्यक्रमात ऋषभ शेट्टी याने महत्त्वाची घोषणा केली आहे. ऋषभ शेट्टी म्हणाला, ‘सिनेमाचा सिक्वल नाही तर, प्रिक्वेल दाखवण्यात येणार आहे. ‘कांतारा 2’ मध्ये सिनेमाची पहिली कथा दाखवण्यात येणार आहे.’ सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.

मीडिया रिपोर्ट्स, ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा 2’ सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येवू शकतो. २०२२ मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये ‘कांतारा’ सिनेमाचं देखील नाव आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने मोठी मजल मारली होती. ‘कांतारा’ सिनेमाने जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘कांतारा’ सिनेमा तुम्ही ओटीटीवर देखील पाहू शकता.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांनी त्याचं इतर भाषांमध्ये डबिंग केलं. कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही या चित्रपटाने जोरदार कमाई केली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.