ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन

अभिनेता रणबीर कपूर याने वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्याची परवानगी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितली होती (Actor Rishi Kapoor Funeral)

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 4:47 PM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा-अभिनेता रणबीर कपूर, पत्नी-अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासह कुटुंबातील 20 जण उपस्थित होते. (Actor Rishi Kapoor Funeral)

ऋषी कपूर यांचं आज सकाळी (गुरुवार 30 एप्रिल 2020) निधन झालं. ल्यूकेमिया अर्थात रक्ताच्या कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगाव भागात असलेल्या ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले.

लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक वगळता अन्य कोणालाही उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी 20 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. रणबीर कपूरने वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्याची परवानगी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितली होती. अनुकंपा तत्त्वावर कपूर कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारातील 20 जणांना प्रवासाची संमती मिळाली होती.

ॠषी कपूर यांची कन्या रिद्धिमा कपूर दिल्लीत होती. तिलाही दिल्लीतून मुंबईला येण्याची परवानगी मिळाली. रेल्वे आणि विमान सेवा बंद असल्यामुळे ती रस्तेमार्गे दिल्लीतून मुंबईत येणार होती, मात्र ती प्रायव्हेट जेटने दिल्लीहून मुंबईला येण्यास निघाली. परंतु त्याआधी दुपारी चार वाजताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘हे’ 20 जण ऋषी कपूर यांच्या अंत्यविधींना उपस्थित 

1. रणबीर कपूर (मुलगा) 2. नीतू कपूर (पत्नी) 3. रीमा जैन (बहीण) 4. मनोज जैन (रीमा यांचे पती) 5. अरमान जैन (भाचा) 6. आदर जैन (भाचा) 7. अनिशा जैन (अरमानची पत्नी) 8. राजीव कपूर (भाऊ) 9. अभिनेते रणधीर कपूर (भाऊ) 10. अभिनेत्री करीना कपूर खान (पुतणी) 11. अभिनेता सैफ अली खान (करीनाचा पती) 12. बिमल पारेख 13. नताशा नंदा (भाची) 14. अभिनेता अभिषेक बच्चन (कौटुंबिक मित्र) 15. डॉ. तरंग 16. अभिनेत्री आलिया भट (रणवीरची मैत्रीण) 17. दिग्दर्शक अयान मुखर्जी (रणवीरचा मित्र) 18. जय राम 19. दिग्दर्शक राहुल रवैल (ऋषी कपूर यांचे मित्र) 20. दिग्दर्शक रोहित धवन

संबंधित बातम्या :

D Day | चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं, मात्र अंत्यदर्शन न देताच दोघांचाही निरोप

Rishi Kapoor | संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा ते देशात आणीबाणी लावा, बिनधास्त ऋषी कपूरांची बेधडक वक्तव्यं

Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Rishi Kapoor | बॉबी ते नगिना, ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द

PHOTO : ऋषी कपूर यांचे बाल कलाकार ते तारुण्यातले न पाहिलेले फोटो

Actor Rishi Kapoor Funeral

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.