रितेश देशमुखची ‘तार’ रसिकांच्या मनाला भिडणार, ‘हा’ दिग्दर्शक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार!

रितेश देशमुखने 'तार' या लघुपटाची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून उलगडली आहे.

रितेश देशमुखची ‘तार’ रसिकांच्या मनाला भिडणार, ‘हा’ दिग्दर्शक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणेच मराठीतही तितकाच सक्रिय आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही रितेश बोलबाला आहे. अभिनयासोबतच रितेश देशमुख निर्मिती क्षेत्रामध्येसुध्दा कार्यरत आहे. लवकर तो आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत काही लघु चित्रपट (Short Film) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याने आपल्या ‘तार’ या लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. (Riteish Deshmukh presenting Marathi short film featuring nagraj manjule)

रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. लवकरच ही संस्था काही मराठी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यापैकी पहिला लघुपट एका पोस्टमनची गाथा सांगणार आहे. ‘तार’ असे या लघुपटाचे नाव असून, तो लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘तार’ या लघुपटात प्रसिध्द दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘नाळ’ या चित्रपटानंतर नागराज मंजुळे या लघुपटात झळकणार आहेत. युवा दिग्दर्शक पंकज सोनवणे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. (Riteish Deshmukh presenting Marathi short film featuring nagraj manjule)

पोस्टवर झळकले नागराज मंजुळे

रितेश देशमुखने ‘तार’ या लघुपटाची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून उलगडली आहे. सोबतच तारमधील नागराज मंजुळे यांचे पोस्टमनच्या रुपातले सुरेख इलस्ट्रेशन केलेले पोस्टरही त्याने शेअर केले आहे. या पोस्टरवरूनच रितेश देशमुखची ही ‘तार’ प्रेक्षकांच्या मनाला भिडणार असल्याचे कळते आहे. सध्या दुर्मिळ होत चाललेला पोस्टाचा डबा आणि बंद पडलेली ‘तार’ सेवा यासह पोस्टमन काकांची कथा या लघुपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Riteish Deshmukh presenting Marathi short film featuring nagraj manjule)

रितेश सध्या त्याच्या आगामी बिग बजेट चित्रपटात व्यस्त आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या भव्य अशा चित्रपटाला संगीत देण्याची धुरा अर्थातच अजय-अतुल यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. (Riteish Deshmukh presenting Marathi short film featuring nagraj manjule)

‘द कपिल शर्मा’ कार्यक्रमात रितेश–जेनेलियाची धमाल!

नुकतीच रितेश आणि जेनेलियाने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघेही धमाल मस्ती करताना दिसले. या कार्यक्रमात आलेल्या जेनेलिया आणि रितेशची फिरकी घेण्यासाठी कपिलने त्यांना एक मजेशीर सवाल केला. रितेश (Riteish Deshmukh) अभिनेता आहेच, पण तो एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे लग्नाच्यावेळी तू त्याच्यासोबत सात फेरे घेतलेस की, त्याच्याकडून राजकीय लोक घेतात तशी शपथ वदवून घेतलीस, असा सवाल कपिलने जेनेलियाला केला. त्याला जेनेलियाने उत्तर देण्याऐवजी रितेशनेच उत्तर देऊन कपिलची बोलती बंद केली. लग्नात आम्ही फेरे घेतले. शपथ घेतली जाते, तेव्हा पाच वर्षांनी सरकार बदलत असते. त्यामुळे आम्ही शपथ न घेता फेरे घेतले आहे, अशी मिश्किल टिप्पणी रितेशने करताच मंचावर एकच खसखस पिकली.

(Riteish Deshmukh presenting Marathi short film featuring nagraj manjule)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *