बिग बींच्या विहिणीचं निधन, एका दिवसात 17 हजार पॉलिसी विक्रीचा गिनीज रेकॉर्ड

2013 पासून रितू नंदा यांच्यावर अमेरिकेत कर्करोगाचे उपचार सुरु होते. त्या 71 वर्षांच्या होत्या.

बिग बींच्या विहिणीचं निधन, एका दिवसात 17 हजार पॉलिसी विक्रीचा गिनीज रेकॉर्ड

नवी दिल्ली : ‘शोमॅन’ राज कपूर यांची कन्या, अभिनेते ऋषी आणि रणधीर कपूर यांच्या भगिनी रितू नंदा यांचं आज (मंगळवारी) सकाळी निधन झालं (Ritu Nanda Passed Away). रितू नंदा या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदांच्या सासूबाई होत्या. गेल्या सात वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली रितू नंदा यांची झुंज अखेर अपयशी ठरली.

रितू नंदा यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी अमिताभ बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन मुंबईहून विमानाने रवाना झाले. 2013 पासून रितू नंदा यांच्यावर अमेरिकेत कर्करोगाचे उपचार सुरु होते. त्या 71 वर्षांच्या होत्या.

रितू नंदा यांचा विवाह 1969 मध्ये राजन नंदा यांच्याशी झाला होता. त्यांचा पुत्र निखिल नंदा हे श्वेता बच्चन यांच्याशी विवाहबंधनात अडकले. त्यांना नव्यानवेली ही मुलगी आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी राजन नंदा यांचंही निधन (Ritu Nanda Passed Away) झालं.

रितू नंदा यांची प्रसिद्ध आंत्रप्रिन्योर म्हणून ओळख आहे. लाईफ इन्शुरन्सशी संबंधित त्या बिझनेस करत होत्या. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांची दखल गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली होती. त्यांनी एकाच दिवसात तब्बल 17 हजार पॉलिसी विकण्याचा विक्रम नोंदवला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *