'रोडीज्' फेम रघु राम 44 व्या वर्षी बाबा होणार!

रोडीज फेम रघु रामने आपण बाबा होणार असल्याची गुड न्यूज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. नताली ही रघुची दुसरी पत्नी आहे

'रोडीज्' फेम रघु राम 44 व्या वर्षी बाबा होणार!

मुंबई : ‘रोडीज्’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेला टीव्ही सेलिब्रिटी रघु राम बाबा होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रघुने नताली डि ल्युसिओसोबत लगीनगाठ बांधली होती. रघुने आपण बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अॅडव्हेंचरसाठी सज्ज होत आहे.’ असं कॅप्शन देत रघुने आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नतालीचं बेबी बम्प दिसत आहे. तर तिच्या हातात चिमुकल्या बाळाचे बूट दिसत आहेत. नतालीला टॅग करुन #OverTheMoon असा हॅशटॅगही रघुने दिला आहे.

44 वर्षीय रघुचं हे दुसरं लग्न आहे. रघु आणि नताली यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी लगीनगाठ बांधली होती. गोव्यामध्ये दाक्षिणात्य पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता. या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

 

View this post on Instagram

 

Getting ready for the biggest adventure of my life yet! @nataliediluccio #OverTheMoon

A post shared by Raghu Ram (@instaraghu) on

रघु आणि नताली यांची प्रेमकहाणी अनोखी आहे. नताली ही इटालियन-कॅनडियन गायिका आहे. नतालीच्या यूट्यूब चॅनलवर रघुने तिचं गाणं पहिल्यांदा ऐकलं. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातलं ‘कहीं तो होगी वो’ हे गाणं नतालीने वेगळ्या पद्धतीने सादर करत अपलोड केलं होतं. 2011 मध्ये दोघांची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाली.

रघु आणि नताली रिलेशनशीपमध्ये होते, त्यावेळी तो विवाहित होता. 2006 साली रघु सुगंधा गर्गसोबत विवाहबंधनात अडकला होता. योगायोग म्हणजे सुगंधाने  ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातच भूमिका केली होती.


रघु आणि सुगंधा यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं. रघु आणि त्याचा जुळा भाऊ राजीव ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोचं परीक्षण करत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *