‘इन्फिनिटी’साठी ‘आयर्न मॅन’ला 524 कोटींचं मानधन, ‘अॅव्हेंजर्स’साठी किती?

मुंबई : हॉलिवूड सिनेमा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातही या सिनेमाने पाच दिवसात 200 कोटी पेक्षा अधिक कमाई केलेली आहे. बक्कळ अशी कमाई करत सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले. तसेच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनीही या सिनेमामध्ये मोठी कमाई केली आहे. हॉलिवूड सिनेमा म्हटलं की, सर्वात मोठ्या बजेटचे सिनेमे …

‘इन्फिनिटी’साठी ‘आयर्न मॅन’ला 524 कोटींचं मानधन, ‘अॅव्हेंजर्स’साठी किती?

मुंबई : हॉलिवूड सिनेमा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातही या सिनेमाने पाच दिवसात 200 कोटी पेक्षा अधिक कमाई केलेली आहे. बक्कळ अशी कमाई करत सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले. तसेच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनीही या सिनेमामध्ये मोठी कमाई केली आहे.

हॉलिवूड सिनेमा म्हटलं की, सर्वात मोठ्या बजेटचे सिनेमे येथे तयार केले जातात. अॅव्हेंजर्स सिनेमामध्येही आयर्न मॅनची भूमिका साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांनी ‘इन्फिनिटी’ सिनेमासाठी तब्बल 524 कोटी रुपये घेतले होते. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांनी सिनेमाच्या प्रॉफिटमध्येही भागिदारीची मागणी केली होती.

या अभिनेत्याने स्पायडर मॅन होमकमिंग सिनेमामध्ये तीन दिवसांच्या कामासाठी प्रति दिन 5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 50 ते 60 लाखांपेक्षा अधिक फी घेतली होती. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर हॉलिवूडमधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. एका सिनेमासाठी रॉबर्ट डाऊनी 20 मिलियन डॉलर म्हणजेच (139 कोटी) घेतात.

रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांच्या फीवरुन अंदाज लावू शकता येतो की, अॅव्हेंजर्स सिनेमासाठी त्यांनी किती फी घेतली असेल. अॅव्हेंजर्स एंडगेमने भारतीय बाजारात 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाईड हा सिनेमा 8000 कोटी रुपये कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *