Roopa Ganguly Birthday Special | ‘अभिनय’ ते ‘राजकारण’, ‘द्रौपदी’ फेम रूपा गांगुलींचा संघर्षमय प्रवास

रूपा गांगुली यांनी (Roopa Ganguly) चित्रपटांतून ‘अभिनेत्री’ म्हणून जितकी प्रसिद्धी कमावली तितकेच नाव आणि प्रेम ‘राजकारणा’तूनही मिळवले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:48 AM, 25 Nov 2020

मुंबई : रूपा गांगुली यांनी (Roopa Ganguly) चित्रपटांतून ‘अभिनेत्री’ म्हणून जितकी प्रसिद्धी कमावली तितकेच नाव आणि प्रेम ‘राजकारणा’तूनही मिळवले. रूपा गांगुलीने फक्त हिंदी आणि बंगाली चित्रपटातूनच काम केले नाही तर, तिने दूरदर्शनवरही काम केले आहे. ‘महाभारत’ या कार्यक्रमात रूपा गांगुली यांनी साकारलेली ‘द्रौपदी’ची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात आहे. रूपा गांगुलीला त्यांच्या या भूमिकेमुळे चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले (Roopa Ganguly Birthday Special).

आज (25 नोव्हेंबर) ‘महाभारता’च्या या ‘द्रौपदी’चा अर्थात रूपा गांगुलींचा वाढदिवस आहे. रूपा गांगुली आज वयाच्या 55व्या वर्षात पदार्पण करत आहे. अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेल्या रूपा गांगुली सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार आहेत.

रूपा गांगुली यांच्या आयुष्यातील काही किस्से :

  • रूपा गांगुली उत्कृष्ट अभिनेत्री असण्याबरोबरच एक अतिशय सुंदर गायिका देखील आहे. ‘अबोशेशे’ या बंगाली चित्रपटातील गाण्यांसाठी ‘सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायका’चा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
  • महाभारतात, द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या दृश्यावेळी रूपा खरंच रडू लागल्या होत्या. संवादा सुरू असताना त्यांना मध्येच रडू येत होते. शोच्या क्रूने त्यांना शांत करण्यासाठी सुमारे अर्धा तास घालविला. महाभारताच्या मेकिंग व्हिडीओमध्ये त्यांचे हे दृश्य आजही जपून ठेवण्यात आले आहे.
  • ‘द्रौपदी वस्त्रहरण’ दृश्यासाठी सुमारे 250 मीटर साडी वापरली गेली होती. जी साडी विशेष ऑर्डर देऊन बनवून घेण्यात आल्याचे म्हटले जात होते. पण रूपाची ही लांब साडी, खरोखर लांबलचक नव्हती हे फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. वास्तविक रूपाने केवळ 6 मीटर साडी नेसली होती. स्पेशल इफेक्टद्वारे ही साडी 250 मीटर लांब करण्यात आली होती (Roopa Ganguly Birthday Special).
  • रूपा यांनी ‘सच का सामना’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला होता. विवाहित असूनही तिचे दुसर्‍या कोणाशी संबंध असल्याशी कबुली दिली होती. त्यांनी सांगितले की, महाभारत शो करत असताना, को-स्टारबरोबर त्यांचे अफेअर सुरू होते.
  • 1992 मध्ये रुपा गांगुलीचे ध्रुब मुखर्जीशी लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 2009 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांनाही एक मुलगा असून, त्याचे नाव आकाश आहे.
  • माध्यमांच्या वृत्तानुसार रूपाने ध्रुबसाठी आपली कारकीर्ददेखील पणाला लावली होती. एक काळ असा होता की त्यांना खर्चासाठी पतीकडून पैसेदेखील मिळत नव्हते. यामुळे दोघांमध्ये बरीच भांडणे झाली. यामुळे नैराश्य आलेल्या रूपा यांनी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

(Roopa Ganguly Birthday Special)