
बॉलिवूडमध्ये येऊन काम करणं अनेकांचं स्वप्न असतं, पण प्रत्येकालाच तिथे यश मिळतंच असं नाही. अनेकदा चांगलं टॅलेंट असूनही अनेक कलाकारा त्यांची ओळख मिळवण्यात अपशी ठरतात. आज आपण अशा एका सुंदर आणि तितक्याच टॅलेंटेड अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी राजघराण्यातील आहे आणि तिच्या अदांनी, सौंदर्याने कित्येकांचं मन तिनं जिकलंय. पहिल्याच चित्रपटात तिने साक्षात किंग खान अर्थात शाहरूखसोबत काम केले, जो प्रचंड यशस्वीही ठरला. तिला खूप ओळख, प्रसिद्धी मिळाली. अभिनय, सौंदर्यासाठी तिचं खूप कौतुकही झालं, पण त्यानंतरही ती मोठं यश मिळवून टॉप स्टार बनू शकली नाही. मात्र तेव्हाच तिच्या आयुष्यात असं एक वळण आलं की ते एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली. त्यांचा रोमान्स खूप चर्चेत होता, नंतर त्याचं लग्नही झालं. लग्नाच्या बऱ्याचा काळाने ती आई बनली, कोण आहे ती अभिनेत्री, काय करते सध्या ?, ते जाणून घेऊया.
कोण आहे सौंदर्यवती अभिनेत्री ?
खरं सांगायचं तर, ही सुंदर सौंदर्यवती, दुसरी तिसरी कोणी नसून “चक दे इंडिया” चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे आहे. या चित्रपटात सागरिकाने शाहरुख खानसोबत काम केलं होतं आणि तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्षही वेधून घेतलं. विशेष म्हणजे चित्रपटात दाखवलंय की ती एक हॉकी प्लेअर आहे, पण हे बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल की सागरिका ही खऱ्या आयुष्यात देखील, राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू आहे. त्यामुळेच तिला या चित्रपटात काम करण्याची देखील संधी मिळाली. तिचे अभिनय कौशल्य, खेळाबद्दलची तिची उत्कृष्ट समज देखील कौतुकास्पद होती.
राजघराण्याची लेक बनली क्रिकेटरची पत्नी
सागरिकाचा जन्म एका राजघराण्यात झाला. तिचे वडील विजय सिंह घाटगे हे कागलच्या राजघराण्याचे राजे आहेत. 2017 साली सागरिकाने स्टार क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केले, जे खूप गाजले. दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर लग्न केले. लग्नापूर्वी, युवराज सिंग आणि हेजल कीचच्या लग्नात ते पहिल्यांदा सार्वजनिकरित्या एकत्र स्पॉट झाले, त्यांची लव्हस्टोरी खूप चर्चेतही होती. लग्नानंतर सागरिकाने चित्रपटांऐवजी तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिले, ग्लॅमरच्या दुनियेपासून ती थोडी दूर राहिली.
नुकतीच झाली आई
लग्नाच्या आठ वर्षांनी सागरिका आणि झहीर ई-बाबा झालेत. तिने नुकतेच फतेहसिन खान या मुलाला जन्म दिला. पण तिच्या गरोदरपणाची कोणतीही बातमी समोर आली नसल्याने, सरोगसीद्वारे बाळाची गर्भधारणा झाल्याची अटकळ व्यक्त होत आहे. पण सागरिकाने याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, सागरिकाने चक दे इंडियानंतर “मिले ना मिले हम,” “फॉक्स,” आणि “रश” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी व्यतिरिक्त, तिने मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली. तिचा शेवटचा चित्रपट “इरादा” हा 2017 साली प्रदर्शित झाला होता. दीर्घ विश्रांतीनंतर, सागरिका 2020 मध्ये “फूटफेरी” द्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर परतली, परंतु हे कमबॅक फारसे यशस्वी ठरले नाही.