#SacredGames2 रिलीज, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

नेटफ्लिक्सवर 'सेक्रेड गेम्स 2' चा दुसरा सिझन लाँच होताच सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे. अशाच काही मनोरंजक मीम्सचा आढावा

#SacredGames2 रिलीज, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

#SACREDGAMES2 मुंबई : ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games 2 ) चा दुसरा सिझन रिलीज झाला आणि तमाम चाहत्यांच्या रात्री बारा वाजता नेटफ्लिक्सवर (Netflix) उड्या पडल्या. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्यामुळे जागरण करुन अख्खा सिझन पाहण्याचा प्लॅन आधीच ठरलेला होता. सिझन ऑनलाईन स्ट्रीम होताच सोशल मीडियावर मीम्सचाही पाऊस पडायला सुरुवात झाली.

‘मध्यरात्रीच्या ठोक्याला जग निद्राधीन झालं असताना, भारत जागृत झाला आहे… सेक्रेड गेम्स सिझन 2 पाहण्यासाठी’ हा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर तुफान व्हायरल झाला आहे. याला पार्श्वभूमी आहे ती भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केलेल्या भाषणाची. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजताची वेळ साधत नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स सिझन 2’ प्रदर्शित केला.

नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, रणवीर शोरी, पंकज त्रिपाठी, अमृता सुभाष, अमेय वाघ अशी तगडी स्टारकास्ट दुसऱ्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

पंचवीस दिवसात काय होणार? गणेश गायतोंडेचं काय झालं? सरताजला सत्य समजेल का? अमेय वाघ कोणत्या भूमिकेत दिसणार? पहिल्या सिझनमध्ये दिसलेले काटेकर, कुकू पुन्हा दिसतील का? त्रिवेदीचं सत्य काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंटीच्या छत्रीचं काय झालं?

एक ना दोन.. नाना प्रश्न ‘सेक्रेड गेम्स’च्या फॅन्सनी मनात वर्षभर जपून ठेवले होते. ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ या प्रश्नाप्रमाणेच ‘सेक्रेड गेम्स’विषयीची उत्सुकता ताणणारे प्रश्न निर्माण झाले आहेत.

एकीकडे, या प्रश्नांचा भुंगा असतानाच सोशल मीडियावर मीम्सही वायरल झाले आहेत. नेटफ्लिक्सवर सिझनची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांपासून गायतोंडेचे टाळ्या आणि शिट्या मिळवणारे डायलॉग्ज… असं भरपूर खाद्य मीमसाठी उपलब्ध झालं आहे. त्यापैकी काही इंटरेस्टिंग मीम्सवर एक नजर

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *