बॉक्स ऑफिसवर 'साहो'चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट 'साहो'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Saho movie, बॉक्स ऑफिसवर ‘साहो’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) चित्रपट ‘साहो’ने (Saho) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘साहो’ चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेलुगूमध्ये चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींची कमाई केली आहे. तसेच तेलुगूमध्ये अनेक ठिकाणी साहोने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

बाहुबलीच्या मोठ्या यशानंतर प्रभासला खूप अपेक्षा होती की साहोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच साहो चित्रपटासाठी प्रेषकांमध्ये मोठा उत्साह होता. जगभरात या चित्रपटाने 10 हजार स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित केला होता. भारतात हा चित्रपट 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. 350 कोटी रुपयांच्या बजेटचा हा चित्रपट आहे. पहिल्या दिवसात या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. आंध्र प्रदेशात या चित्रपटाने 42 कोटी रुपयांची कमाई केली. तर तेलंगणामध्ये या चित्रपटाने 14.1 कोटी केली आहे.

दरम्यान, साहो चित्रपट ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड तोडण्यात अयशस्वी ठरला आहे. ‘बाहुबली 2’ ने देशभरात पहिल्या दिवशी 214 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण ‘साहो’ला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. सध्या साहो चित्रपटावर समीक्षकांनीही टीका केली आहे आणि सोशल मीडियावरही चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे.

साहोच्या हिंदी आवृत्तीला 24 कोटींसह अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ आणि अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगलचा’ही रेकॉर्डही तोडता आला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *