शाहरुखने माझ्या क्रशचे नाव चोरले, सलमान खानचा आरोप

सलमान खानने अभिनेता शाहरुख खानवर आरोप केला आहे. शाहरुखने माझ्या क्रशचे नाव चोरले असा थेट आरोप त्याने बिग बॉस कार्यक्रमामध्ये केला.

शाहरुखने माझ्या क्रशचे नाव चोरले, सलमान खानचा आरोप
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 5:27 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक किस्से घडत असतात. त्यातील एक किस्सा स्वत: अभिनेता सलमान खानने (Salman Khan accused Shahrukh Khan) सांगितला आहे. सध्या सगळीकडे हिंदी बिग बॉसची चर्चा सुरु आहे. याच कार्यक्रमादरम्यान सलमान खानने अभिनेता शाहरुख खानवर आरोप केला आहे. शाहरुखने माझ्या क्रशचे नाव चोरले असा थेट आरोप त्याने बिग बॉस कार्यक्रमामध्ये केला (Salman Khan accused Shahrukh Khan) .

सलमानला एक किरण नावाची मुलगी फार आवडायची. याबाबत त्याने त्याचा जवळचा मित्र शाहरुख खानला सांगितले होते. सलमानने किरणच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचे बरेच प्रयत्न केले. किरणला कमवता आलं की नाही याबाबत त्याने स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र, शाहरुखला आपण मित्र म्हणून ही बाब सांगितल्यावर त्याने चक्क आपल्या क्रशचे नाव चोरले. किरणचे नाव चित्रपटात घेतले, असा आरोप सलमान खानने शाहरुखवर केला आहे. आता या आरोपांवर शाहरुख काय उत्तर देणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.

शाहरुख खानचा 1993 साली ‘डर’ नावाचा चित्रपट आला होता. सलमानने केलेल्या आरोपांनुसार या चित्रपटात सलमानने त्याच्या क्रशच्या नावाचा वापर केला. या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेत शाहरुखचे आपल्या प्रेयसीवर प्रचंड प्रेम दाखवले गेले आहे. या चित्रपटात अभिनेत्री जूही चावलाने ‘किरण’ नावाची भूमिका साकारली होती.

बिग बॉस कार्यक्रमात अभिनेता अजय देवगन आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोल आली होती. यावेळी थट्टा-मस्करीत सलमानने शाहरुखवर आरोप केला. बिग बॉसच्या विकेंडच्या भागात या सगळ्या मजेशीर गोष्टी बघायला मिळाल्या होत्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.