Pathan | ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे…’, शाहरुख-सलमानची जोडी पुन्हा एकत्र झळकणार?

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:30 PM, 6 Nov 2020
रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात शाहरुख त्याच्या 'DDLJ' या चित्रपटातील राहुलची भूमिका साकारणार आहे, तर सलमान त्याच्या ‘मैंने प्यार किया’या चित्रपटातील प्रेमच्या लूकमध्ये दिसणार आहे.

मुंबई : मोठ्या पडद्यावरच्या अनेक जोड्या पुन्हा एकदा एकत्र याव्या, असे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच वाटत असते. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडचे लाडके ‘करण-अर्जुन’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan). ‘करण-अर्जुन’नंतर या दोन दिग्गजांनी पुन्हा एकत्र काम केलेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकावे, अशी अनेक चित्रपट रसिकांची इच्छा आहे. शाहरुख-सलमानच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे (Salman Khan and Shahrukh khan to star in film together).

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या वृत्ताने दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा शाहरुखने केलेली नाही. तरीही या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी आता त्यांचे चाहते करू लागले आहेत.

शाहरुखच्या आगामी चित्रपटाची घोषणा

कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, लवकरच शाहरुख खान त्याच्या ;पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अभिनेता जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याच चित्रपटात आता सलमान खानची एंट्री झाल्याचे कळते आहे.(Salman Khan and Shahrukh khan to star in film together)

सलमान खानचा कॅमिओ

माध्यमांच्या रिपोर्टनुसार शाहरुखच्या या चित्रपटात सलमान एका लहानश्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीही सलमानने शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘झिरो’ चित्रपटाच्या एका गाण्यात हजेरी लावली होती. तेव्हापासून हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार अशी चर्चा रंगली होती.

या आधीही झळकलेले एकत्र

‘करण-अर्जुन’ या चित्रपटानंतर जरी हे दोघेही मोठ्या भूमिकांमध्ये एकत्र झळकले नसले, तरी मागच्या दशकांत त्यांनी एकमेकांच्या चित्रपटांत लहान-लहान भूमिका केल्या आहेत. सलमान खानने शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता. तर, शाहरुख खानने सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता.

(Salman Khan and Shahrukh khan to star in film together)