दमदार डायलॉग, धडाकेबाज अॅक्शन, सलमानच्या ‘भारत’चा टीझर लॉन्च

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी ‘भारत’ (Bharat) सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंद एवढ्या अवधीच्या या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि धडाकेबाज अॅक्शन सीन दिसून येतात. त्यामुळे सलमानच्या आधीच्या भूमिकांना साजेशी असेच एकंदरीत सीन याही सिनेमात असतील, यात शंका नाही. ‘भारत’ असे सलमान खानच्या व्यक्तिरेखेचं नाव या सिनेमात […]

दमदार डायलॉग, धडाकेबाज अॅक्शन, सलमानच्या 'भारत'चा टीझर लॉन्च
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी ‘भारत’ (Bharat) सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंद एवढ्या अवधीच्या या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि धडाकेबाज अॅक्शन सीन दिसून येतात. त्यामुळे सलमानच्या आधीच्या भूमिकांना साजेशी असेच एकंदरीत सीन याही सिनेमात असतील, यात शंका नाही.

‘भारत’ असे सलमान खानच्या व्यक्तिरेखेचं नाव या सिनेमात असून, त्याने आडनाव का लावलं नाही, याबाद्दल टीझरमध्ये सलमान काही संवादांमधून समाजवून सांगतो. कुठल्यातरी सर्कसमध्ये बाईकवरुन आगीतून सलमान खानची एन्ट्री होते. सलमान खानने ट्वीटर-फेसबुकवरुन हा टीझर शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये टीझरने यूट्यूबवर लाखोंचा टप्पा पार केला आहे.

”अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि मेरा सरनेम क्या है, जाति क्या है, धर्म क्या है… और मैं उनसे मुस्कुरा कर कहता हूं कि इस देश के नाम पर मेरे बाबूजी ने मेरा नाम भारत रखा. अब इतने बड़े नाम के आगे जाति, धर्म, सरनेम लगाकर न तो अपना न ही, इस देश का मान कम कर सकता हूं.” या सलमानच्या डायलॉगने टीझरची सुरुवात होते. त्यावेळी सलमान खान बाईकवरुन स्टंट करत असतो. एकंदरीतच या सिनेमात स्टंट, डायलॉगचा तडका असेल, यात शंका नाही.

अली अब्बास जफर हे ‘भारत’ सिनेमाचे दिग्दर्शक असून, अभिनेत्री कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोव्हर हेही यात दिसणार आहेत. ‘भारत’ सिनेमा 2019 च्या म्हणजे यंदा ईदला रिलीज होणार आहे. खूप महिन्यांपासून या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे टीझरवर सलमानच्या चाहत्यांनी अक्षरश: उड्या मारल्या आहेत. आता सिनेमाच्या ट्रेलरची वाट चाहते पाहत आहेत.

VIDEO : ‘भारत’ सिनेमाचा ट्रेलर :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.