विवाहसंस्था मृतावस्थेत, माझा लग्नावर विश्वास नाही : सलमान खान

मुंबई: बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या लग्नाची चर्चा अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये होत आहे. त्याला अनेकदा या विषयावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यावर वेळोवेळी सलमानने उत्तरेही दिली आहेत. मात्र, यावेळी त्याने आपला विवाहसंस्थेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विवाहसंस्था मृतावस्थेतील संस्था असल्याचेही नमूद केले. सलमान म्हणाला, “माझा विवाहात विश्वास नाही. ही एक मृतावस्थेतील संस्था आहे असं …

विवाहसंस्था मृतावस्थेत, माझा लग्नावर विश्वास नाही : सलमान खान

मुंबई: बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या लग्नाची चर्चा अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये होत आहे. त्याला अनेकदा या विषयावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यावर वेळोवेळी सलमानने उत्तरेही दिली आहेत. मात्र, यावेळी त्याने आपला विवाहसंस्थेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विवाहसंस्था मृतावस्थेतील संस्था असल्याचेही नमूद केले.

सलमान म्हणाला, “माझा विवाहात विश्वास नाही. ही एक मृतावस्थेतील संस्था आहे असं मला वाटतं. माझा विवाहावर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही.” सलमानला मुलगा दत्तक घेण्याबाबत विचारल्यानंतर तो म्हणाला की हे जेव्हा होणार असेल तेव्हा होऊन जाईल. सलमानला अनेकदा आत्मचरित्र लिहिण्यासाठी आग्रह झाला आहे. मात्र, त्याने तसे करण्यास नकार दिला आहे. तसेच आपण या निर्णयावर ठाम असल्याचेही त्याने नमूद केले.

भारत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंद घालण्याची याचिका फेटाळली

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती जे. आर. मिधा आणि चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने याचिकेत काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी केवळ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असून चित्रपट नाही, असेही नमूद केले.

खंडपीठाने न्यायालयात या चित्रपटाचे ट्रेलर पाहिले आणि त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगितले. याचिकाकर्ते विकास त्यागी यांनी ‘भारत’ या शब्दाचा व्यापारी उद्देशासाठी उपयोग करता येणार नाही, असे म्हणत ही याचिका केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *