सलमानकडून चाहत्यांसाठी खास गिफ्ट, 'चुलबुल पांडे'चे GIF लाँच

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या 'दबंग-3'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान वेगवेगळे फंडे वापरतो आहे

सलमानकडून चाहत्यांसाठी खास गिफ्ट, 'चुलबुल पांडे'चे GIF लाँच

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या ‘दबंग-3’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान वेगवेगळे फंडे वापरतो आहे (Dabangg 3). विशेष म्हणजे सलमान सह ‘दबंग-3’ची संपूर्ण टीम सोशल मीडियाचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुरेपुर वापर करत आहे (Dabangg 3).

 

 

आता सलमानने त्याच्या चाहत्यांना आणखी एक खास गिफ्ट दिलं आहे. सलमानचे फॅन्स आता ‘दबंग-3’ मधील चुलबुल पांडेचे GIF व्हॉट्सअॅपवर वापरु शकणार आहेत (Chulbul Pande GIF). नुकतंच हे GIF व्हॉट्सअॅपवर लाँच करण्यात आलं. 22 नोव्हेंबरपासून हे GIF इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टीकटॉक लाईव्हवर पण उपलब्ध होईल. दबंगचे हे GIF सलमानच्या चाहत्यांना आकर्षित करत आहेत (Chulbul Pande GIF).

 

 

सलमानचं चुलबुल पांडे हे एक लोकप्रिय पात्र आहे आणि या पात्राची लोकप्रियता आता GIF च्या स्वरुपात कॅच करण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे. प्रभुदेवा (Prabhu Deva) दिग्दर्शित ‘दबंग-3’ येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात ‘दबंग’मध्ये दिसलेली सलमान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा दिसणार आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान या सिनेमात ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. याच बरोबर सलमान या सिनेमात सईसोबतही रोमान्स करताना दिसणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *