सलमानच्या बिईंग ह्यूमनच्या मॅनेजरची मॉडेलला मारहाण, एक कान निकामी?

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या संस्थेचा सीईओ मनिष मंधानावर एका मॉडेलला मारहाण केल्याचा आरोप आहे. मॉडेल अँड्रिया डिसीझाने ही तक्रार केली आहे. याबाबत मॉडेलने मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मॉडेल अँड्रिया डिसूझाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मनिषने तिला इतकी जबर मारहाण केली की तिच्या श्रवण क्षमतेवर विपरित परिणाम झाला. तिला …

सलमानच्या बिईंग ह्यूमनच्या मॅनेजरची मॉडेलला मारहाण, एक कान निकामी?

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या संस्थेचा सीईओ मनिष मंधानावर एका मॉडेलला मारहाण केल्याचा आरोप आहे. मॉडेल अँड्रिया डिसीझाने ही तक्रार केली आहे. याबाबत मॉडेलने मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मॉडेल अँड्रिया डिसूझाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मनिषने तिला इतकी जबर मारहाण केली की तिच्या श्रवण क्षमतेवर विपरित परिणाम झाला. तिला एका कानाने कमी ऐकू येत आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, 2015 साली बिईंग ह्यूमनच्या स्टोअर लाँचवेळी दुबईत अँड्रिया आणि मनिषची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. डिसेंबर 2015 मध्ये अँड्रिया ही मुंबईत आली. मनिष विवाहित असल्याचं माहित असतानाही अँड्रिया त्याच्या प्रेमात पडली. त्याने अँड्रियाला सांगितले की, तो लवकरच त्याच्या बायका-पोरांपासून वेगळा होणार आहे. मात्र, मनिषचे फक्त अँड्रियासेबतच नाही तर अनेक मुलींसोबत अफेयर होते. याबाबत तो अँड्रियाशी खोटं बोलला होता.

ऑगस्ट 2017 ला मनिषने पहिल्यांदा अँड्रियाला मारहाण केली. तेव्हा अँड्रियाला ‘बिग बॉस 11’ च्या ऑडिशनसाठी जायचं होतं. मात्र, मनिषने केलेल्या मारहाणीमुळे तिचा चेहरा सुजल्याने, ती हे ऑडिशन देऊ शकली नाही. त्याच्या इतर मुलींशी असलेल्या नात्यांबाबत जेव्हाही अँड्रिया त्याला विचारायची तेव्हा तो तिला मारहाण करायचा, असे अँड्रियाने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी अँड्रियाचे नातेवाईक तिला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा तिच्या उजव्या कानाची नस दुखावल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं.

गावदेवी पोलिसांनी अँड्रियाची तक्रार दाखल केली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. अँड्रियाने या तक्रारीसोबतच मेडिकल रिपोर्ट आणि तिचे जखमी अवस्थेतील फोटोही पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. तर दुसरीकडे मनिष मंधानाने यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *