'ठाकरे' पाहिल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात....

'ठाकरे' पाहिल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात....

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. या ना त्या कारणाने सिनेमाही रोज चर्चेत राहतो आहे. आता मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी ‘ठाकरे’ सिनेमा पाहिल्यानंतर ‘तिखट’ प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमाबद्दल बोलताना संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाचा – हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल?

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

“कालच ठाकरे चित्रपट बघितला, त्यावेळचं स्वाभिमानी नेतृत्व आणि आत्ताचं लाचार नेतृत्व फरक लगेच जाणवतो.”, अशी काहीशी तिखट आणि आपल्या स्वभावाला साजेशी अशी आक्रमक प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अर्थात, त्यांनी या प्रतिक्रियेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे आताचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची तुलना करुन, देशपांडे यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी ‘लाचार’ असे संबोधले आहे.

कोण आहेत संदीप देशपांडे?

संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मुंबई महापालिकेत नगरसेवक राहिलेले संदीप देशपांडे हे आपल्या आक्रमक आणि सडेतोड राजकारणामुळे ओळखले जातात. मराठी माणसासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या फळीतील संदीप देशपांडे असून, राज ठाकरेंचे निकटवर्तीय सुद्धा मानले जातात. राज ठाकरे यांच्याशी त्यांचे राजकीय तसेच कौटुंबिक जिव्हाळ्याचे सबंध आहेत. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या टीकेलाही तितकेच महत्त्व आहे. शिवाय, संदीप देशपांडे यांच्याकडे सध्या मनसेचे सरचिटणीसपद आहे.

‘ठाकरे’वरुन याआधीही संदीप देशपांडे मैदानात

‘ठाकरे’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे व कुटुंबीयांना बसायलाही जागा न दिल्याने, संजय राऊत यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी #ISupportAbhijitPanse असा हॅशटॅगही चालवण्यात आला. या ऑनलाईन मोहिमेतही संदीप देशपांडे यांनी सहभाग नोंदवला होता. शिवाय, निर्माते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेवर ‘ठाकरे’चे निर्माते संजय राऊत किंवा शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरे सिनेमा प्रदर्शित

शिवसेना स्थापन होण्याचे आधीचे काही वर्षे, शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरचे काही वर्षे असा सुरुवातीचा पट या सिनेमातून मांडला गेला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांनी 60-70 च्या दशकात उठवलेला आवाज, पुढे हिंदुत्त्वाची धरलेली कास, दरम्यानच्या काळातली महत्त्वाची आंदोलने इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत. 25 जानेवारी रोजी ठाकरे सिनेमा प्रदर्शित झाला आहे. वाचा – ‘ठाकरे’ची कालपर्यंत 16 कोटींची कमाई, आज किती?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *